Pune Porsche Car Accident: 'ससून संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही'; कल्याणीनगर अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

supriya sule on pune porsche car accident: ललित पाटील आणि कल्याणीनगर अपघात प्रकरणाने चर्चेत आलेल्या ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढली जावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
supriya sule on pune porsche car accident
supriya sule on pune porsche car accidentEsakal
Updated on

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. तर अपघाताच्या तपासात ससून रूग्णालयाचे नाव समोर आले आहे. ससून मधील दोन डॉक्टरांनी या प्रकरणात पुरावे लपवल्याचा आरोप आहे. या संपुर्ण प्रकरणामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत असतानाचा ससून रूग्णालायाच्या कामकाजाची समीक्षा करून त्यांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ससून रूग्णालय चर्चेत आले आहे. आधी ललित पाटील प्रकरण आणि आता कल्याणीनगरमध्ये झालेला अपघात या दरम्यान सुप्रिया सुळेंनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी, असंही सुळेंनी पुढं म्हटलं आहे.

ससूनच्या दोन मोठ्या डॉक्टरांना अटक

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन डॉक्टरांवर कारवाई केली आहे. ससुनचे डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ससून जनरल हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

supriya sule on pune porsche car accident
Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपात अटक; कुटुंबीय म्हणतात, 'अजय तावरेंचा या प्रकरणाशी आणि ललित पाटीलशी...'

सुप्रिया सुळेंनी काय लिहलं आहे आपल्या पोस्टमध्ये?

पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. तर आता कल्याणीनगर 'हिट ॲन्ड रन' प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली.

supriya sule on pune porsche car accident
Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या जामीनाच्या आदेशावर सही देणारे जज नव्हे तर...; याप्रकरणातही चौकशीची शक्यता

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे. वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. कोरोना काळात देखील येथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते .शिवाय अनेक नामांकित डॉक्टर येथून शिकून गेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावर देखील शंका घेतली जात आहे. काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही.

supriya sule on pune porsche car accident
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघातप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची धक्कादायक माहिती; म्हणाले, 'सर्वांची नावे...'

तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.