Pune Porshe Accident: मुलाला जामीन मंजूर करताना झाल्या पुष्कळ चुका, समितीचा अहवाल सादर

Pune Porshe Kalyani Nagar Accident : चार ते पाच दिवसांत झालेल्या चुकांबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.
 मुलाला जामीन मंजूर करताना झाल्या पुष्कळ चुका, समितीचा अहवाल सादर
Pune Porshe Accidentsakal
Updated on

Pune Crime: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाच्या (जेजेबी) सदस्यांकडून पुष्कळ चुका राहिल्या आहेत, असा अहवाल या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केला आहे.

त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, चार ते पाच दिवसांत झालेल्या चुकांबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.

अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळातील सदस्यांनी निकषांचे पालन केले की नाही? हे पडताळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने २२ मे रोजी पाच सदस्यांची समिती नेमली होती.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतुदींनुसार ही समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने त्यांचा १०० पानी अहवाल सादर केला असून त्यानुसार ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने पोर्शे कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते.

या मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले. त्यावेळी अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांबरोबर पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन करणे आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यावे, या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, ज्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता, त्या अटींबाबत देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

 मुलाला जामीन मंजूर करताना झाल्या पुष्कळ चुका, समितीचा अहवाल सादर
Pune Porshe Accident: देसाईंच्या नोटीसवर काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

सदस्यांकडून नियमांची पायमल्ली

जामिनाचा आदेश देताना झालेल्या चुका या अहवालात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. जामिनाचा आदेश सुरूवातीला एका सदस्याने दिला असला तरी, दुसऱ्‍या दिवशी दुसऱ्या सदस्याने त्याला संमती दिल्याने नियमांची पायमल्ली झाल्याचे अहवालात नमूद आहे.

बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा सुमारे शंभर पाणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार संबंधित सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, चार ते पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सदस्यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास विभाग

 मुलाला जामीन मंजूर करताना झाल्या पुष्कळ चुका, समितीचा अहवाल सादर
Pune Porshe Accident:अल्पवयीन आरोपीचे ब्लड फेकून भलत्याचेच फेक रिपोर्ट? अमितेश कुमार यांचा खुलासा

या अटींवर झाला होता जामीन

- अपघातावर ३०० शब्दांत निबंध लिहायचा

- १५ दिवस येरवडा पोलिसांवर वाहतूक नियमनाचे काम करायचे

- मंडळ बोलावले तेव्हा मंडळात हजर व्हायचे

- मुलगा वार्इट संगतीत जाणार नाही याची पालकांनी काळजी घ्यायची

- व्यसनमुक्तीबाबत मुलाला मुक्तांगणमध्ये समुपदेशन करावे

 मुलाला जामीन मंजूर करताना झाल्या पुष्कळ चुका, समितीचा अहवाल सादर
Porsche Accident Pune: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी घडामोड! बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.