आळेफाटा - विशाखा महिला तक्रार निवारण समिती यांच्या वतीने आळे(ता.जुन्नर)येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित, ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे आणि बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे मधील सर्व विद्यार्थिनींकरिता व त्यांच्या माता पालकांसाठी पोरी जरा जपून या विषयावर प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रा. विजया मारोतकर, नागपूर यांचा प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
प्रा.विजयाताई यांनी आपल्या काव्यमय कार्यक्रमातून- बेसावध असलेल्या लेकिंनो सावध व्हा, मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, सुरक्षा ॲप डाऊनलोड करा. तसेच अश्लीलता आवर गं पोरी, 'फुलपाखरू होईल म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते' या कवितेतून मुलीचे जीवन तर 'ठिगळ' कवितेतून आईचे कष्टमय जीवन दाखवून दिले. त्याचबरोबर आहाराविषयी महत्त्व सांगताना मुलींनी तिरंग्याच्या रंगाच्या आहाराचे सेवन करावे आणि जाता -जाता शेवटी मुलींनी समाजात कसे वागावे याविषयी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना प्रतिज्ञा दिली.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थाणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नयना डोके या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये आळे गावच्या माजी सरपंच वर्षा कुऱ्हाडे,कोळवाडी गावच्या सरपंच अतिशा कुऱ्हाडे, संतवाडी गावच्या उपसरपंच स्मिता पाडेकरतसेच ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळातील सर्व संचालकांच्या सुविद्य पत्नी, परिसरातील सर्व संस्थांच्या महिला पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, बाळासाहेब जाधव ,भाऊ कुऱ्हाडे, किशोर कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, कैलास शेळके, दिनेश सहाणे, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे, बी. जे. कॉलेज आळेचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, ज्ञानमंदिर आळेचे प्राचार्य संदीप भवारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अभिप्राय सिमा हुलवळे ,अश्विनी कुऱ्हाडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. अरुणा वाघोले यांणी केले तसेच सूत्रसंचालन जयश्री कदम यांणी केले व आभार नूतन जोशी यांनी मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.