Pune Water Protest : दिवसाआड पाणीपुरवठ्याला विरोध; खराडी चंदननगर, नागरिक आंदोलनाच्या तयारीत

सप्ताहातून फक्त तीनच दिवस पाणी मिळणार असल्यामुळे या भागातील टँकर लॉबी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 water supply
water supplyesakal
Updated on

Pune Water Protest - पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद केला असताना आता खराडीमध्ये दिवसाड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्ताहातून तीनच दिवस पाणी देण्याच्या या निर्णयाला नागरिकांचा विरोध असून त्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. त्यामुळे खराडीतील पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत.

 water supply
Pune : शहर विकासाची 'मिसिंग लिंक '

खराडीतील चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, चौधरी वस्ती, सातववस्ती, पंढरीनगर, गुलमोहर, रक्षकनगर, शंकरनगर. बोराटे वस्ती गल्ली नं. १ ते १३, शंकरनगर, वृंदावन सोसायटी,

राघवेंद्रनगर, यशवंतनगर, तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर, गणपती सोसायटी, तुकारामनगर, बोराटेवस्ती, झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर भागामध्ये दिवसाआढ पाणीपुरवठ्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

 water supply
Mumbai : उन्हाळ्यात माथेरानची राणी सुसाट! अवघ्या तीन महिन्यात मध्य रेल्वेची १.०१ कोटींची कमाई!

सध्या या भागामध्ये अगोदरच अपुरा पाणीपुरवठा होतो. गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते. त्यामुळे येथील रहिवासी आणि अनेक सोसायटी यांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. अशातच दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

सप्ताहातून फक्त तीनच दिवस पाणी मिळणार असल्यामुळे या भागातील टँकर लॉबी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून पाण्याचा काळाबाजार होऊन नागरिकांची पिळवणूक होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी रोज आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा प्रशासनाने करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

सुरेश पाटोळे (रहिवासी, शांतीनगर )

आम्ही शहरात असूनही येथील परिस्थिती खेड्यापेक्षा वाईट आहे. रोज फक्त पाच दहा मिनिटे पाणी मिळते. त्यात दिवसाड पाणी म्हटलं तर काय करायचं. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्हाला रोज दोन तास, परंतु पुरेशा दाबाने पाणी द्या.

 water supply
Mumbai News : 'मरे'वर महिन्याभरात ९४१ चेन पुलिंगच्या घटना; ७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

बाळा पर्हाड (चंदननगर )

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मान्य नाही. हा निर्णय रद्द करावा. संपूर्ण पुणे शहर सोडून फक्त खराडीवरच अन्याय का ? अगोदरच कमी पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त नागरिक यामुळे टँकर लॉबीच्या कचाट्यात सापडतील.

प्रभा करपे ( रेसिडेंट वेल्फेअर , खराडी)

कार वॉशिंग सेंटर, लहान पान टपऱ्या यांना सुद्धा पाण्याचे बेकायदा नळजोड दिलेले आहेत. त्यामुळे खराडी मध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. सर्वाधिक मालमत्ता कर पुणे महापालिकेला देऊनही जर खराडीला सप्ताहातून तीनच दिवस पाणी दिले जाणार असेल तर हा निर्णय आम्हाला मान्य नाही.

 water supply
Pune : कात्रजच्या संस्कृती आर्ट्स ग्रुपचा हिमाचल प्रदेशात डंका

आशिष माने ( वडगाव शेरी नागरिक मंच)

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय फक्त खराडीसाठीच का? या अन्यायकारक निर्णयाला आमचा विरोध आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही सोमवारी आंदोलन करणार आहोत.

नितीन जाधव (अभियंता, पाणीपुरवठा विभाग)

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झालेला भाग हा बहुतांशी बैठ्या घराचा आहे. यातील बऱ्याच भागांना शेवटच्या घरापर्यंत पाणी मिळत नाही. दिवसाआड पुरेशा दाबाने पाणी दिले तर प्रत्येक घराला पाणी मिळेल. म्हणून हा निर्णय घेतला. समान पाणीपुरवठा योजनेच्या टाक्या आणि वितरण व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर सर्व भागाला पाणी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.