Pune: पुणे-दौंड-पुणे हा प्रवास होणार आणखी वेगवान, रेल्वेचा ताशी वेग १३० किमी

त्यानंतर मुख्य संरक्षक आयुक्तांकडून या मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे.
Railway service
Railway servicesakal
Updated on

पुणे - पुणे-दौंड रेल्वे प्रवासात १० मिनिटांची बचत होणार आहे. पुणे-दौंड दरम्यानच्या मार्गावरून रेल्वे गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतील, असे आदेश मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी पुणे विभागाला दिले आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार असून पुणे-दौंड-पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Railway service
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था! पाहणीसाठी आलेले भाजपचे मंत्रीच अडकले वाहतूककोंडीत

पुणे-दौंड रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी रुळांची क्षमता वाढविण्यात आली आहे. मध्य विभागाचे मुख्य संरक्षक आयुक्त मनोज अरोरा यांनी या मार्गाची तपासणी करून काही सूचना दिल्या होत्या. पुणे रेल्वे प्रशासनाने त्या सूचनांची पूर्तता केली.

त्यानंतर मुख्य संरक्षक आयुक्तांकडून या मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानंतर मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी देखील या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

Railway service
Mumbai News : मुंबईत काँग्रेसला खिंडार! तीन माजी नगरसेवकांनी दिला राजीनामा; शिंदे गटात जाणार?

पुणे हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे विभाग आहे.

पुणे-दौंड लोहमार्गावर ताशी १३० किमी वेगाची मंजुरी मिळाली असून सोमवारपासून काही गाड्या या वेगाने धावणार आहेत. नंतर काही दिवसांत या सेक्शनमध्ये सर्व प्रवासी गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावतील.

- ब्रिजेश कुमार सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.