Pune : निविदेतील हस्तक्षेपामुळे पुण्याची बदनामी

पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या निविदेत राजकीय हस्तक्षेप झाल्याने पेठांसह उपनगरांमधील रस्त्याची कामे ठप्प
Pune
PuneSakal
Updated on

पुणे - विकासकामांच्या निविदेत स्वतःचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींची नावे महापालिका प्रशासनाने जाहीर केली पाहिजेत.

अशा लोकांमुळे शहराची बदनामी होते. रस्त्याची कामे चांगली व्हावीत, यासाठी कामाच्या खर्चासह निविदेतील सर्व तपशील महापालिकेने जाहीर केला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या निविदेत राजकीय हस्तक्षेप झाल्याने पेठांसह उपनगरांमधील रस्त्याची कामे ठप्प झाली आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार समोर आणला. त्यावर वाचकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Pune
Mumbai : केडीएमसी फेल, 27 गावे बाहेर काढा; आमदार राजू पाटील यांची मागणी

विकासकामांच्या निविदेत स्वतःचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींची नावे महापालिका प्रशासनाने जाहीर केली पाहिजेत. अशा लोकांमुळे शहराची बदनामी होते.

रस्त्याची कामे चांगली व्हावीत, यासाठी कामाच्या खर्चासह निविदेतील सर्व तपशील महापालिकेने जाहीर केला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या निविदेत राजकीय हस्तक्षेप झाल्याने पेठांसह उपनगरांमधील रस्त्याची कामे ठप्प झाली आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार समोर आणला. त्यावर वाचकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Pune
Mumbai : बारवी धरण 100 टक्के भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

मतदान करणाऱ्या आणि कर भरणाऱ्या नागरिकांना काही लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांमुळे फटका बसत आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून शहरातील रस्ते खराब असताना स्वतःचे उखळ पांढरे करण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहेत. प्रशासक काळात लोकप्रतिनिधींच्या दबावाला अधिकाऱ्यांनी बळी पडू नये.

- आदित्य गायकवाड

शहरातील रस्ते, पदपथांच्या निविदा काढून खर्चासह कामाचे स्वरूप, ठेकेदार, साहित्याचा तपशील महापालिकेने जाहीर केला पाहिजे. त्यावर तज्ज्ञांची, नागरिकांची मते मागवावीत. लोकप्रतिनिधींचेही म्हणणे ऐकून घ्यावे. पण, निविदेत लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत असतील तर त्यांची नावे महापालिका प्रशासनाने जाहीर केली पाहिजेत.

- विष्णू नायडू

लोकप्रतिनिधीच चुकीच्या पद्धतीने वागणार असतील आणि नागरिकांना त्रास देणार असतील तर आगामी निवडणुकीत मतदान करताना ‘नोटा’चाच पर्याय मतदारांनी निवडला पाहिजे.

- एक नागरिक

महापालिकेचे कोणतेही काम राजकीय लोकांच्या मर्जीतील ठेकेदाराला मिळाले पाहिजे, ही जणू परंपराच झाली आहे. त्यासाठी निकष बदलले जात आहेत.

- प्रशांत उमरदंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.