सासवड शहर : पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात अंजीर उत्पादक शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे जबरी तडाखा बसला. एक महिन्यापूर्वी सुरू झालेला हंगाम अवकाळीत पूर्ण अडकला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील ६०० एकरावरील बागा पूर्णपणे धोक्यात आल्या आहेत.
पुरंदर तालुक्यात एक डिसेंबर रोजी पावसाने ४८ तासांपेक्षा अधिक काळ जोरदार हजेरी लावली. त्याची झळ अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. दिवे, काळेवाडी, जाधववाडी, झेंडेवाडी, सोनोरी, गुरोळी, राजेवाडी आदी भागात अंजीर बागा मोठ्या प्रमाणावर आहेत.
अवकाळी पावसामुळे अंजिरातील टिकाऊपणा कमी होतो. तसेच तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे यावर फवारणी करण्यासाठी शेतकरी उत्पादकांचा एकरी एक ते दीड लाख रुपये हा फवारणीचा खर्च वाढणार आहे.
सध्या पुणे-मुंबई येथील बाजारपेठेत प्रति अडीच किलो अंजिराला अडीचशे रुपये बाजार भाव मिळत आहे. पण हे बाजारभाव अवकाळी पावसामुळे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
अंजीर उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळीचीही कुऱ्हाड कोसळली आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात. अंजीर उकलू नये म्हणून प्रतिलिटर पाण्यामध्ये दीड ग्रॅम बोरॉन मिसळून फवारावे आणि कॅल्शिअम नायट्रेट पाच ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- दिलीप जाधव, सचिव, राज्य अंजीर उत्पादक संशोधन संघ, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.