Pune - बोपगाव (ता.पुरंदर) येथील बी.ई. (सिव्हील), एम.टेक. (पर्यावरण अभियांत्रिकी) असलेल्या प्रयोगशिल शेतकरी व उद्योजक ज्ञानेश्वर दत्तात्रेय फडतरे व एम. फार्म. झालेल्या शेतकरी गटाच्या पल्लवी ज्ञानेश्वर फडतरे या शेतकरी दांपत्याने सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प स्वतःच्या सुधारीत तंत्रज्ञानातून कमी खर्चिक व अधिक प्रभावीपणे सांडपाण्याचे शुध्दीकरण करण्याच्या हेतूने हा `बायोड्रम` नावाने प्रकल्प साकारला आहे.
या तंत्रज्ञानाच्या प्रकल्पास भारत सरकारचे पेटंटही (स्वामित्व हक्क) प्राप्त झाले आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य असे की., प्रचलीत सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाच्या तुलनेत याला खर्च 60 ते 70 टक्केच येतो. शिवाय वीजबिल 30 ते 40 टक्के येते.. जागाही 30 ते 40 टक्केच लागत असल्याने हे तंत्रज्ञान प्रसारास व विस्तारास मोठी संधी राहणार आहे.
किमान शंभर फ्लॅटची बिल्डींग किंवा गृहनिर्माण सोसायटीस बांधकाम परवानगी देताना सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प करण्याची प्रशासनाची अट असते. त्यामुळे अशा अटीची पुर्तता करताना हा कमी खर्चिक, कमी विजेत चालणारा व कमी जागेतील हा प्रकल्प असून या प्रकल्पात सांडपाण्यातील बाजूला निघणारा गाळ हा नित्यपणे न काढता..
वर्षातून एकदाच तो गाळ काढवा लागतो., असा कमी त्रासदायक हा प्रकल्प आहे. शिवाय पाण्याचे शुध्दीकरण प्रचलीत प्रकल्पांपेक्षा अधिक प्रभावी होते., हे सिद्ध झाल्याचा दावा प्रकल्पाचे म्हणजेच फडतरे एन्व्हाएरो सोलुशन प्रा. ली. चे संचालक ज्ञानेश्वर फडतरे यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी किरण हसबनीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक करुन पेटंट मिळाल्यामुळे याच्या विक्रीसाठी वेगळ्या मान्यतेची गरज नाही. फक्त बाहेर पडणारे शुद्धीकरण झालेले पाणी मंडळाच्या मानांकनात बसणारे असावे. जिथे जिथे प्रकल्प केले जातील, तेथील चाचण्या मंडळ घेतच असते.
असे श्री. हसबनीस यांनी स्पष्ट केल्याचीही माहिती संचालक श्री. फडतरे यांनी दिली. भारत सरकारच्या पेटंटनंतर आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी 157 देशातील सरकारकडे पेटंट प्रस्ताव दिला आहे. पेटंट मिळणे हेच मुळात जगभरात असे तंत्रज्ञान एकमेव असल्याचे सिद्ध करते. त्यामुळे इतर देशातील पेटंटबाबत लवकरच यश मिळेल., असेही संचालीका पल्लवी ज्ञा. फडतरे म्हणाल्या.
काय व कसा आहे प्रकल्प.?
* प्रचलीत सध्या एम.बी.बी.आर. तंत्रज्ञानाची हा सांडपाणी प्रकल्प म्हणजे सुधारीत आवृत्ती आहे
* पूर्णतः जैविक तंत्रज्ञानावर आधारीत ही `बायोड्रम` प्रकल्प रचना आहे
* प्रकल्पात कुठलेही केमिकल लागत नाही., हातळण्यास सुलभ आहे
* `बायोड्रम`मध्ये जीवाणु सांडपाण्यातील घाणीची विल्हेवाट लावतात.
* यात स्क्रिन चेंबर, बायोड्रम, सँडफिल्टर, कार्बन फिल्टर, युव्ही (निर्जंतुकीरण) याचा समावेश
* उत्पादक कंपनी 15 वर्षाची मेकॅनिकल वारंटी देत आहे.
* शंभर फ्लॅटसाठी दिवसाला 70 हजार लिटर्स शुध्द पाणी देणारा प्रकल्प पुरेसा ठरतो
* 70 हजार लिटर्स क्षमतेची प्रचलीत प्रकल्पाची किंमत बांधकामासह 27 लाख रु.घरात
* `बायोड्रम`मध्ये हाच प्रकल्प 20 ते 22 लाख रु.दरम्यान बसतो
* प्रचलीत प्रकल्पास वर्षिक 18 ते 20 लाख रुपये वीजबिल येते
* `बायोड्रम`मधील प्रकल्पास 5 ते 7 लाख रु.वीजबिल येते
* प्रचलीत प्रकल्पास 80 ते 90 चौरस मी. जागा लागते.
* `बायोड्रम`च्या प्रकल्पास 20 ते 25 चौरस मी. जागा लागते
* प्रचलीत प्रकल्पात गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी वार्षिक 4 ते 5 लाख रु. खर्च
* `बायोड्रम`च्या प्रकल्पामध्ये वर्षातून एकदा 10 हजार रुपये खर्च येतो
* प्रचलीत प्रकल्पात बंदीस्त नसल्याने दुर्गंधी येते
* `बायोड्रम`च्या प्रकल्पामध्ये बंदीस्तपणा असल्याने दुर्गंधी नाही
``बायोड्रम`च्या सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प बसविण्यास मंडळाची पाणी चाचणी वगळता अन्य शासकीय वा इतर परवानग्यांची आवश्यकता नाही. गृहप्रकल्पाने ठरविले की हा सुधारीत `बायोड्रम` प्रकल्प बसविता येते. जागा वाचत असल्याने निमशहरी, शहरी भागात हा सहजपणे परवडणारा सांडपाणी प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोकळ्या जागेसह अंडरग्राऊंड, टेरेसवर किंवा उंच स्ट्रक्चरवर बसविता येतो.``
- ज्ञानेश्वर फडतरे, संचालक - फडतरे एन्व्हाएरो सोलुशन प्रा. ली., बोपगाव, ता.पुरंदर (संपर्क 7588580494)
- चौकट
``बिल्डर जेंव्हा बिल्डींग सोसायटीच्या ताब्यात देतात, त्यावेळी सांडपाणी प्रचलीत प्रकल्पाचा खर्च जास्त व देखभाल दुरुस्तीही खर्चिक असते. त्यामुळे बिल्डर किंवा सोसायटी प्रकल्प चालविण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे `बायोड्रम`चा सुधारीत प्रकल्प कमी खर्चिक, कमी विजेत चालणारा व कमी जागेतील असल्याने तो अखंड चालवून लाभदायक ठरलेला आहे.``
- पल्लवी फडतरे, संचालिका ः फडतरे एन्व्हाएरो सोलुशन प्रा. ली., बोपगाव, ता.पुरंदर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.