पुण्यात रेल्वे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी; पण पीएमपीला....

PMP-Bus
PMP-Bus
Updated on

पुणे - शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरविणाऱ्या पीएमपीला घरघर झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बहुसंख्य बस जागेवरच उभ्या असल्यामुळे त्यांच्या देखभालीपासून अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. परिणामी पीएमपीला घरघर लागली आहे. बसची वाहतूक ठप्प झाल्यामुळे पीएमपीचा तोटा १२५ कोटींपेक्षा जास्त झाला आहे. दरम्यान, रेल्वे, विमान, रिक्षा, कॅब सुरू करण्यासाठी परवानगी दिली मात्र, पीएमपीला का वगळले जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

तोटा १२५ कोटींवर 
रिक्षा कॅबला परवानगी 
बसला मात्र आडकाठी!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पीएमपीची वाहतूक सेवा १८ मार्चपासून शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. दोन्ही शहरांतील अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सध्या फक्त पीएमपीची बस वाहतूक सुरू आहे. लॉकडाउन आता काही प्रमाणात शिथिल आहे. अनेक कारखाने, उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. कष्टकऱ्यांना कामावर पोचण्यासाठी रिक्षा, कॅबवर अवलंबून राहवे लागत आहे. परंतु, त्यांचे दर परवडत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. बससेवा सुरू करण्यासाठी पीएमपीने दोन्ही महापालिकांशी दोन वेळा पत्राद्वारे संपर्क साधला आहे. नियम पाळून बस वाहतूक सुरू करता येईल, असे प्रशासनाने सुचविले आहे. तसेच बसच्या क्षमतेच्या निम्मेच प्रवासी घेतले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. परंतु, दोन्ही महापालिकांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. 

पाच कोटी थकीत
मिशन ‘वंदे भारत’अंतर्गत परदेशातील भारतीयांना पुण्यात आणले आहे. लोहगाव विमानतळ ते संबंधित हॉटेल्समध्ये प्रवाशांना पोचविण्यासाठी बस वापरल्या जात आहेत. सुमारे तीन महिन्यांपासून ही वाहतूक सुरू आहे. त्याचे सुमारे ५ कोटी रुपये भाडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे थकले आहेत.

दोन्ही शहरांत पीएमपीची वाहतूक सुरू करण्यासाठी दोन दिवसांत दोन्ही महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. दोन्ही शहरांत सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे, अशी भूमिका आहे. 
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी

लॉकडाउन हा आता अनलॉक होऊ लागला आहे. सर्वच गोष्टींना परवानगी दिली जाऊ लागली आहे. तर पीएमपी बंद ठेवून काय साध्य होणार?  
- संजय शितोळे, पीएमपी, प्रवासी मंच

मला दररोज कामावर जाण्यासाठी बसची गरज भासते. परंतु, बस बंद असल्यामुळे शेअर रिक्षाने जावे लागते. त्याचे पैसे परवडत नाहीत. तसेच गर्दी, पावसाच्या वेळेस ती मिळतही नाही. बस सुरू झाली तर, हा त्रास कमी होईल.
- श्रद्धा जाधव, घरेलू कामगार

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()