पुणे: हजारभर इग्वाना, दोनशेभर कासव आणि फायटर माशांची तस्करी; दोघांना अटक

पुणे: हजारभर इग्वाना, दोनशेभर कासव आणि फायटर माशांची तस्करी; दोघांना अटक
Updated on

पुणे : वाहतुकीचा परवाना व कागदपत्रे नसताना तसेच सीमाशुल्क विभागाची परवानगी न घेता परदेशी प्राण्याची तस्करी करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून २७९ कासव, एक हजार २०७ इग्वाना आणि २३० फायटर मासे जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी हे चेन्नई एलटीटी एक्प्रेसने प्रवास करीत होते. (Pune Railway Police has arrested two people for smuggling rare species of tortoise fish and lizard from Pune railway station)

पुणे: हजारभर इग्वाना, दोनशेभर कासव आणि फायटर माशांची तस्करी; दोघांना अटक
इकडे सरकार-ट्विटरमध्ये तणाव; तिकडे 'कू' ने जमवले २१८ कोटी

आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. तरुणकुमार मोहन (वय २६, रा. चेन्नई) आणि श्रीनिवास कमल (वय २०, रा. तमिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही मासे पार्सल करण्याचे काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हांतर्गत विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमधून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अधिक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांना रेल्वेत पेट्रोलिंग कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठ ते १० दिवसांपासून वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवर पेट्रोलिंग सुरू होते.

पुणे: हजारभर इग्वाना, दोनशेभर कासव आणि फायटर माशांची तस्करी; दोघांना अटक
पुणे शहर व जिल्ह्यातील नद्यांमधील अतिक्रमणे काढण्याचा आदेश

मंगळवारी (ता. २५) चेन्नई एलटीटी एक्प्रेसमध्ये दोन्ही आरोपी सहा बॅग घेऊन प्रवास करीत होते. संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये कासव, इग्वाना जातीचे प्राणी आणि फायटर मासे मिळून आले. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली आहे. लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मौला सय्यद, सहायक पोलिस फौजदार सुनील भोकरे, जगदीश सावंत, पोलिस हवालदार सुनील कदम, सुहास माळवदकर, पोलिस नार्इक दिनेश बोरनारे, फिरोज शेख आणि बेबी थोरात यांनी ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()