Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर मोफत विधी सेवा व मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
legal service and mediation center opening
legal service and mediation center openingsakal
Updated on

पुणे - जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने पुणे रेल्वे स्टेशनवर मोफत विधी सेवा व मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे स्टेशनवर सुरू करण्यात आलेला हा देशातील पहिलाच कक्ष आल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.

पुणे जिल्हा बाल कामगार मुक्त करण्याकरिता सर्व कारखानदारांकडून हमीपत्र घेण्याचे यावेळी कामगार विभागाकडून घोषित करण्यात आले. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती. बाल कामगारांचा बचाव करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सात दिवसांच्या विशेष अभियानाची सुरवात मंगळवारी (ता.२०) करण्यात आली. कामगार विभागाच्या मदतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तर कक्षाच्या माध्यमातून सर्व गरजू व पीडित व्यक्ती तसेच अटकेत असणाऱ्यांना मोफत विधी सल्ला व सेवा पुरविण्यात येणार आहे.

कक्षाचे उद्घघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्‍याम चांडक यांच्या हस्ते करण्यात आले.

सहायक कामगार आयुक्त गजानन शिंदे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राणी खेडीकर, नंदिता अंबिके, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. कॅरोलिन ओडवा डी वॉल्डर, प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील आणि डिव्हार्इन जैन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शहा यावेळी उपस्थित होते.

legal service and mediation center opening
Student Agitation : शाळेला शिक्षक मिळावे म्हणून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

या दोन्ही उपक्रमांचे आयोजन न्यायाधीश श्‍याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सोनल पाटील यांनी केले होते. बाल कामगारांवर होणारा अन्याय थांबावा. तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे या उद्देशाने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तसेच कक्षाच्या माध्यमातून मोफत विधी सेवा पुरवली जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक बाबी प्राधिकरणाच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.