पुणे रेल्वेकडून ३३ मालगाड्यांची वाहतूक; ५ कोटी ३२ लाखांचा गल्ला जमवला

railway update
railway updatesakal media
Updated on

पुणे : पुणे रेल्वे विभागाने (Pune railway) बांगलादेश आणि देशातील विविध राज्यांमध्ये ऑटोमोबाईल उत्पादनांच्या (automobile transport) ३३ माल गाड्यांची वाहतूक (goods train transportation) करून ऑक्टोबर महिन्यात ५ कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त (railway income) केले आहे. विभागामार्फत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या मालाची वाहतूक नियमितपणे केली जाते. यामध्ये वाहन, साखर, पेट्रोलियम आदी उत्पादनांचा समावेश असून जीवनावश्यक वस्तू सुरक्षित पोचविल्या जातात.

railway update
PM मोदींच्या आदेशानुसार हटवली राष्ट्रपती भवनातली रद्दी अन् झाला कोटींचा फायदा

रेल्वेला ऑक्टोबर महिन्यात मिळालेले हे महसुली उत्पन्न आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न असून, यापूर्वी जुलै २०२१ मध्ये, २० माल गाड्यांच्या वाहतुकीतून ३ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाणिज्य आणि संचालन विभागाच्या व्यवसाय विकास युनिट टीमच्या संयुक्त प्रयत्नांतून उत्तम मार्केटिंग करण्यात आले. परिणामी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध नवीन ठिकाणे आणि ग्राहक शोधले गेले. जलद आणि सुरक्षित वाहतूक, परवडणारे दर, आदी वैशिष्ट्यांमुळे, नवीन व्यवसाय मिळवण्यात विभाग यशस्वी ठरला असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.