Pune : नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्याचे अर्धशतक; गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी

खोऱ्यातील चार धरणांमध्ये ५५ टक्के पाणी साठा
Pune
PuneSakal
Updated on

परिंचे - नीरा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वीर (ता. पुरंदर) धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

सोमवारी (ता. २४) संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार वीर धरणात ५३ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे शाखा अधिकारी लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले. खोऱ्यातील चार धरणांमध्ये ५५ टक्के पाणी साठा झाला आहे.

Pune
Pune Water Supply : पुण्यातील पाणी कपातीचा ऑगस्ट महिन्यात आढावा

नीरा नदीच्या खोऱ्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा झाला आहे. वीर धरणामध्ये ४.९५ टीएमसी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी विसर्ग बंद असून, डावा कालव्याद्वारे ५०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

नीरा नदीवरील चार धरणांच्या पाणी साठा झपाट्याने वाढ होत असून, भाटघर धरण ५८ टक्के, नीरा देवघर धरण ६४ टक्के; तर गुंजवणी धरण ५५ टक्के भरले असून, या तीनही धरणातून नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही.

नीरा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या चार धरणांमध्ये ५५ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशी चार धरणांमध्ये ७३ टक्के पाणी साठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कमी पाणी साठा झाला आहे.

Pune
Mumbai Rain: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

वीर धरणातून फलटण, इंदापूर, बारामती, माळशिरस, सांगोला, खंडाळा, पंढरपूर, पुरंदर हे तालुके ओलिताखाली येत असून, या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कालव्याद्वारे व नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

आहे. धरणातून सासवड शहरासह लोणंद औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक उपसा सिंचन योजना या धरणावर अवलंबून आहेत.

Pune
Mumbai Rain: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

धरणांतील पाणीसाठ्याची टक्केवारी

भाटघर - ५८ टक्के

नीरा देवघर - ६४ टक्के

गुंजवणी - ५५ टक्के

वीर - ५३ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.