Pune Rains: पावसाचा हाहाकार! पुण्यातील सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल, पाहा व्हिडिओ

Pune Weather: धरण परिसरातील या सततच्या पावसामुळे खडकवासला, मुळशी आणि भुशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे.
Pune Rain Ekta Nagar Sinhagad Road Pune Viral Video
Pune Rain Ekta Nagar Sinhagad Road Pune Viral VideoEsakal
Updated on

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यासह पुण्याला चांगलेच झोडपले आहे. अशात पुण्यासह धरण परिसरात गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस सुरू आहे. धरण परिसरातील या सततच्या पावसामुळे खडकवासला, मुळशी आणि भुशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे.

अशात शहराती एकतानगरमध्ये छातीपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. एकता नगर परिसरातील ५-६ सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. येथे अडकलेल्या २००हून अधिक नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. अधिकच्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आहे.

सिंहगड रोडवरील एकता नगरीमधील पाणी शिरलेलेले सोसायट्यांची नावे

  • द्वारका

  • जलपुजन

  • शारदा सरोवर

  • शाम सुंदर

मुळशी धरण परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने मुळशी धरण जलाशय सकाळी ७ वाजेपर्यंत ७० टक्के क्षमतेने भरलेले होते. त्यामुळे आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.