Pune Rain Latest News: पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने रविवारी (ता. १८) शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. यामुळे शहरवासियांची चांगलीच धांदल उडाली. रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक मंदावल्याने काही रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
रविवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सहा वाजता जोरदार पावसाळा सुरूवात झाली. पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, भोसरी, मोशी, तळवडे, चिखली, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, रहाटणी, हिंजवडी आदी भागात जोरदार पाऊस बरसला.
या पावसामुळे रस्त्यावरील तसेच ठिकठिकाणच्या गल्लीतील पाण्याचा निचरा न झाल्याने काही ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सोबत रेनकोट, छत्री न घेता घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच गैरसोय झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यालगतच्या पुलाखाली अथवा झाडाखाली अनेकजण थांबल्याचे दिसत होते. उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती.
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरील निगडी ते दापोडी या मार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये अनेक दुचाकी चालक पावसापासून बचाव करण्यासाठी थांबल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. तसेच आकुर्डीतील बजाज गेट समोरील भुयारी मार्गासह काळभोरनगर, वल्लभनगर येथील भुयारी मार्गातही मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.
रविवार सुटीचा दिवस असल्याने तसेच सोमवारी रक्षाबंधन असल्याने अनेकजण खरेदीसाठी कुटुंबीयांसह घराबाहेर पडले. यामुळे पिंपरीसह चिंचवड, भोसरी, सांगवी, दापोडी, आकुर्डी आदी ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दी होती. मात्र, सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने ग्राहकांसह दुकानदारांचीही तारांबळ उडाली. अनेक ग्राहक बाजारपेठेत अथवा रस्त्यातच अडकून पडले.
जुनी सांगवी परिसरात आज सायंकाळी मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची रहदारी साठी तारांबळ उडाली. अंतर्गत गल्ल्यांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने गल्ल्यांमधून पाणी तुंबल्याने पुरा नंतर केलेल्या पावसाळी पाणी वाहिन्या व सेवा वाहिन्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.जुनी सांगवीतील चंद्रमणी नगर चौक,पवना नदी किनारा रस्ता कृष्ण मंदिर मठासमोरील रस्ता, पवार नगर, शितोळे नगर शिवांजली कॉर्नर, पवार नगर गल्ली क्र.१ आदी ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने गल्ल्यांमधून पाणी तुंबल्याने नागरिकांना रहदारीसाठी पाण्यातून कसरत करावी लागली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.