Pune Rain News : कोंढव्यात खड्ड्याने घेतला मुलीचा बळी; झाड पडून एकाचा मृत्यू

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ग्रेड सेपरेटरच्या (समतल विलगक) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडणाऱ्या चारपैकी तीन मुलींना वाचविण्यात यश आले; तर एकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ८) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
Pune Rain News
Pune Rain Newssakal
Updated on

कोंढवा : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ग्रेड सेपरेटरच्या (समतल विलगक) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडणाऱ्या चारपैकी तीन मुलींना वाचविण्यात यश आले; तर एकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ८) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असून, गगन उन्नती सोसायटीसमोर महाकाली मंदिराजवळ ग्रेड सेपरेटरसाठी सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या परिसरात बंजारा समाजाची काही कुटुंबे झोपडी टाकून राहत आहेत. चाकू, सुरी अशा घरगुती वापराच्या वस्तूंना धार लावणे, चादर विक्री करून ते उदरनिर्वाह करतात. खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सरगम शिलावत (वय १५), सेजल शिलावत (वय १३), जानूबाई शिलावत (वय १५) आणि मुस्कान शिलावत (वय १६) या चौघी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी खड्ड्यामध्ये पाय घसरून पडल्या.

Pune Rain News
Pune Rain Update : धानोरी, विश्रांतवाडीसह येरवडा परिसरात मुसळधार; पावसामुळे रस्त्याला आले नदीचे स्वरूप

त्यातील तीन मुलींना नागरिकांनी वाचविले, तर मुस्कान हिला अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढले. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोंढवा अग्निशामक दलाकडून समीर तडवी, दशरथ माळवदकर, प्रकाश शेलार, अभिजित थळकर, विश्‍वजित वाघ यांनी मुलींचे शोधकार्य केले.

...अशी झाली घटना

मुस्कानची चप्पल पाण्यात पडल्याने ती घेण्यासाठी पाण्यात उतरली; पण तिला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी सरगम, जानूबाई, सेजल पाण्यामध्ये उतरल्या. मात्र त्यादेखील एकापाठोपाठ बुडू लागल्या. त्यांच्यासमवेत आलेल्या १० वर्षांच्या मुलीने धावत जाऊन तिच्या नातेवाइकांना माहिती दिली. त्यांच्या पालातील जगदीश शिलावत व रमेश शिलावत यांनी घटनास्थळी धाव घेत सरगम, जानूबाई, सेजल यांना बाहेर काढले. मात्र त्यांना मुस्कान सापडली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी तिला बाहेर काढले.

कोथरूड : कर्वे पुतळा आणि शिवाजी पुतळा दरम्यानच्या मार्गावर टपाल कार्यालयापाशी झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुविऺजय बुद्धिराम गौतम (वय ३८, मूळ रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालय छोटे असल्यामुळे ससूनला दाखल करण्यास सांगितले. मात्र ससूनमध्ये उपचारापूर्वीच गौतमचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.