Pune Rain News : पुणे जिल्ह्यात तीन महिन्यात ४४३.९ मिलिमीटर पाऊस

तीन महिन्यातील सरासरीच्या ६६.३ टक्के पावसाची नोंद
pune rain news monsoon imd 443 9 mm rain in Pune district in three months
pune rain news monsoon imd 443 9 mm rain in Pune district in three monthssakal
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या तीन ४४३.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या प्रमाणात आतापर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण हे ६६.३ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३२२.८ मिलिमीटर कमी पाऊस पडला आहे.

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण ७६६.७ मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षी पडलेल्या या पावसाचे हे प्रमाण पावसाळ्यातील पहिल्या तीन महिन्यातील एकूण सरासरी पावसाचे हे प्रमाण ११४.५ टक्के इतके होते.

म्हणजेच गेल्या वर्षी एकूण सरासरी पावसाच्या टक्केवारीच्या तुलनेत सरासरी पावसाहून अधिक १४.५ टक्के पाऊस झाला होता, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात आजअखेरपर्यंत भोर, मावळ आणि आंबेगाव या तीनच तालुक्यात एकूण सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. बारामती आणि पुरंदर या दोन तालुक्यात एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाऊस झाला आहे.

पुणे जिल्ह्याचा १ जूनपासून २६ आॅगस्ट २०२३ पर्यंतचा एकूण सरासरी पाऊस हा ६६९.७ मिलिमीटर इतका पाऊस आहे. प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ४४३.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी १ जूनपासून दररोज पडणाऱ्या पावसाची नोंदणी केली जाते. यानुसार दररोज तालुकानिहाय पडलेला पाऊस, महिनानिहाय एकूण सरासरी पाऊस आणि एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात झालेला पाऊस आदींच्या आकडेवारीचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध केला जातो.

पुणे शहरात फक्त ५६.९ टक्के पाऊस

दरम्यान, पुणे शहरात गेल्या तीन महिन्यात एकूण २५६.१ मिलिमिटर पडला आहे. पुणे शहराचा या तीन महिन्यांचा एकूण सरासरी पाऊस हा ४५०.२ मिलिमिटर इतका आहे. शहरात गेल्या तीन महिन्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण हे ५६.९ टक्के इतके आहे.

तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

- पुणे शहर --- २५६.१

- हवेली --- २०२.४

- मुळशी --- ९४६.८

- भोर --- ८४१.०

- मावळ --- १४०९.४

- वेल्हे --- १७४८.५

- जुन्नर --- २८३.६

- खेड --- ३१७.९

- आंबेगाव --- ५५०.९

- शिरूर --- ११७.६

- बारामती --- ८१.५

- इंदापूर --- १३०.४

- दौंड --- ११३.८

- पुरंदर --- ११९.७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.