Pune Rain: अचानक आलेल्या पावसानं पुण्याला झोडपलं! दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्रेधातिरपीट

रस्त्याच्या बाजुला फुलं आणि पुजेचं साहित्य विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांना आपला माल झाकून ठेवावा लागला. यामध्ये झेंडुची फुलं, नारळ विक्रेत्यांचं नुकसानही झालं आहे.
Pune Rain_Photo : Sandip Kapde
Pune Rain_Photo : Sandip Kapde
Updated on

पुणे : आचानक आलेल्या पावसानं पुणे शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. उद्या दसऱ्या निमित्त पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडले असताना अचानक आलेल्या पावसानं त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. रस्त्याच्या बाजुला फुलं आणि पुजेचं साहित्य विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांना आपला माल झाकून ठेवावा लागला. यामध्ये झेंडुची फुलं, नारळ विक्रेत्यांचं नुकसानही झालं आहे.

Pune Rain_Photo : Sandip Kapde
Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

पुण्यातील पेठांसह कोथरुड, बावधन, औंध सिंहगड रोड सनसिटी, शिवाजीनगर, वारजे, या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या वीस मिनिटांपासून या भागात चांगलाच पाऊस झाला. पण उद्या दसऱ्याचा सण असल्यानं पुजेचं साहित्य आणि इतर खरेदीसाठी बाजारांमध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अचानक आलेल्या पावसानं विक्रेत्यांसह खरेदीदारांचा देखील खोळंबा झाला. यामध्ये फुलं विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी देखील साचलं.

Pune Rain_Photo : Sandip Kapde
Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात 13 किंवा 14 ऑक्टोबरला लागणार आचारसंहिता? शिवसेनेच्या नेत्याचे संकेत

गरबा-दांडियाच्या कार्यक्रमांवर पाणी

नवरात्रीचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं पुण्यात आज मोठ्या प्रमाणावर गरबा आणि दांडियांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. पण आचानक आलेल्या पावसानं या कार्यक्रमावरही पाणी फेरल्याचं दिसून आलं. यामुळं मोठ्या उत्साहात सजून-धजून आलेल्या तरुणाईच्या उत्साहावरही पावसाच्या पाण्यानं विरजण घातलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.