Pune Rain Update: लवासामध्ये मोठी दुर्घटना! दरड कोसळल्याने दोन व्हिला गाडले गेले, 3 ते 4 लोक बेपत्ता

Big accident in Lavasa landslide Pune Rain Update: पुण्यातील लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लवासामध्ये दरड दोन व्हिलांवर कोसळली आहे. व्हिलामध्ये तीन ते चार लोक राहत असल्यांची माहिती मिळत आहे.
Lavasa landslide Pune Rain Update
Lavasa landslide Pune Rain Updateesakal
Updated on

Pune News: पुण्यातील लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लवासामध्ये दरड दोन व्हिलांवर कोसळली आहे. व्हिलामध्ये तीन ते चार लोक राहत असल्यांची माहिती मिळत आहे. चार लोक बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचं 'साम टीव्ही'च्या वृत्तामध्ये म्हणण्यात आलं आहे.

पुण्यामध्ये काल सकाळपासून पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरापासून जवळच असलेल्या लवासामध्ये दरड कोसळली आहे. काही लोक बेपत्ता आहे. अद्याप बचावपथक घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक लोक मदतीचे काम करत आहेत.

Lavasa landslide Pune Rain Update
Pune Rain News : ताम्हिणीत महाविक्रमी ५५६ मिमी पाऊस, आदरवाडी येथे दरड कोसळुन ताम्हिणी-कोलाड रस्‍ता बंद, एकाचा मृत्‍यु

हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लवासातील दोन व्हिलांवर सकाळच्या सुमारास दरड कोसळली. दोन व्हिला किंवा बंगल्यावर ही दरड कोसळली. बंगल्यामध्ये काही लोक राहत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

लवासामध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. लवासामध्ये ४५३.५ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सध्या पुण्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे.

Lavasa landslide Pune Rain Update
Pune Rain: अतिमुसळधार पावसाने झोडपले! मध्यरात्री पीएमसी पुणेकरांच्या मदतीला; जारी केली आपत्कालीन हेल्पलाइन, पर्यटकांनाही इशारा

दरम्यान पुण्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही सोसायटी आणि घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. कंबरेइतक्या पाण्यामधून लोकांना वाट काढून चालावं लागत आहे. दरम्यान, आज पुण्यात सकाळी डेक्कन जीमखाना परिसरात विजेचा करंट लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. टपरी हटवत असताना त्यांना करंट लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com