Pune Rain Update: काही मिनिटांच्या पावसाने पुणेकरांना झोडपले; अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमालाही फटका

Pune Rain Update News: थोड्याच वेळात मुख्यमंत्री हांडेवाडी या भागात श्रीराम शिल्पाच्या अनावरणासाठी येणार आहेत. कार्यक्रमाच्या स्थळी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.
Pune Rain
Pune Rainesakal
Updated on

Pune Rain: दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पाऊस पडला आहे. काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचले आहे. हडपसर भागात मुसळधार पाऊस झाला आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री हांडेवाडी या भागात श्रीराम शिल्पाच्या अनावरणासाठी येणार आहेत. कार्यक्रमाच्या स्थळी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.

शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पाऊस सुरू झालाय. त्यामुळे छत्रीशिवाय बाहेर पडलेल्या पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक भागात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

Pune Rain
Pune Road Condition: आठ कोटी रुपये खर्चून तयार केला रस्ता, मात्र ३ वर्षातच वाजले बारा, मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे पाण्यात ?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.