Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. एक तासाच्या पावसातच शहराच्या अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचलं आहे. अनेक भागात गुडघाभर पाणी साचलं आहे. घोरपडी , सोपान बाग, बी टी कवडे, रेरवाडा भागात मुसळधार पाऊस झालाय. अनेक रस्त्यावर पाणी साचले असून दुचाकी रिक्षा बंद पडत आहे.
एक तासाच्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली आहे. चंदननगर, खराडी या भागामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. घोरपडी व्हिलेज समोर झाड पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.