Pune Rain News : पुण्यात पावसाचा जोर वाढणार घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

गुजरातच्या कच्छ प्रांतातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांमुळे सध्या पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
pune rain update heavy rain in pune ghat region monsoon weather water
pune rain update heavy rain in pune ghat region monsoon weather wateresakal
Updated on

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांमुळे पुण्यात मंगळवारी (ता.२५) दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरात मॉन्सून सक्रीय झाला असून, पुढील काही दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

pune rain update heavy rain in pune ghat region monsoon weather water
Pune Rain : मॉन्सून दाखल होऊन एक महिना उलटला; मात्र अजूनही प्रगती पुस्तक कोरेच, तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची तूट

गुजरातच्या कच्छ प्रांतातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांमुळे सध्या पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आता नव्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय हवेची स्थिती निर्माण होत आहे.

pune rain update heavy rain in pune ghat region monsoon weather water
Pune Rain News : मुळशी तालुक्यात पावसाची संततधार, बंधारे भरण्याच्या मार्गावर

पर्यायाने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातच पावसाचा जोर वाढणार आहे. याच काळात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारी दिवसभर पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. शहरात सरासरी १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लोहगाव येथे २.८ मिलिमीटर पडला.

pune rain update heavy rain in pune ghat region monsoon weather water
Pune Crime News : सिंहगड रस्त्यावर हॉटेलची तोडफोड, लूटमार; कारवाईसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही मारहाण

घाटमाथा आणि कोकणात पर्यटन टाळा

पुढील काही दिवसात कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळण्यापासून जोरदार जलप्रपात तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी कोकण आणि घाटमाथ्यावर जाणे टाळावे, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.