Torna Fort Rain : किल्ले तोरणा परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

किल्ले तोरणा (Torna Fort) परिसरात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.
Torna Fort Rain
Torna Fort Rainesakal
Updated on
Summary

दिवसाआड पडणाऱ्या वादळी पावसामुळे या परिसरातील वीस ते पंचवीस गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आहे.

वेल्हे (पुणे) : किल्ले तोरणा (Torna Fort) परिसरात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. दिवसाआड पडणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासून उकाड्याचे रूपांतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसात (Pune Rain Update) झाले.

वेल्ह्याचे माजी उपसरपंच विकास गायखे व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोरेकर म्हणाले, सुमारे तास ते दीड तास पाऊस कोसळल्याने भात खाचरांना ओढ्याचे स्वरूप आले होते. या जोराच्या पावसामुळे शेतीसह फळझाडांचे तर शेतकऱ्यांच्या (Farmers) घरांसह जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Torna Fort Rain
Pune Porsche Accident : दोघांचा बळी गेल्यानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; कोरेगाव पार्कमधील पब केला जमीनदोस्त

दिवसाआड पडणाऱ्या वादळी पावसामुळे या परिसरातील वीस ते पंचवीस गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून भात शेतीच्या पूर्व मशागतीची कामे रखडली आहेत. या परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जांभूळ, फणस या झाडांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

Torna Fort Rain
Pune Porsche Accident : कल्याणीनगरमधील दुर्घटनेनंतर पुणे महानगरपालिकेची तीन बड्या हॉटेलसह तब्बल 54 ठिकाणी कारवाई

ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडणे, कवले उडणे, भिंती कोसळणे असे लहान-मोठे प्रकार घडून नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जनावरांसाठी राखून ठेवलेल्या चारा वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने, तसेच भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसाळ्यासाठी राखून ठेवलेला चाराच भिजल्याने गुरांच्या साऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com