Pune Rain news in marathi
Pune Rain news in marathiesakal

Pune Rain Update: पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी Indian Army मैदानात! गरज पडल्यास Air Force सज्ज...

flood situation pune: भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत
Published on

पुण्याच्या सखल भागात पडलेल्या अविरत पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून अशा परिस्थितीत पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Indian Army in the field to control the flood situation pune
Indian Army in the field to control the flood situation puneesakal

या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत. लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील.

नागरी प्रशासनाचा समन्वय-

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आज, 25 जुलै 2024 रोजी स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले.

Pune Rain news in marathi
Maharashtra Rain Alert : लंडनसारख्या शहरांमध्ये पाण्याचा निचरा कसा होतो? मुंबई-पुणं पाण्याखाली का जातं? वाचा सविस्तर...
Indian Army in the field to control the flood situation pune
Indian Army in the field to control the flood situation puneesakal

तातडीची मदत कार्यवाही-

एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत. लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे.

पूरस्थिती नियंत्रणासाठी लष्कराचे प्रयत्न-

या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले संपूर्णपणे जय्यत तयारीत आणि सुसज्ज आहेत. लष्कराच्या मदतीमुळे पूरग्रस्त भागातील लोकांना मोठी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. नागरी प्रशासनाने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Pune Rain news in marathi
Pune Heavy Rain Photos: पुण्यात रात्रभर नॉनस्टॉप धो-धो कोसळला, पावसाचे भयानक दृश्य कॅमेरात कैद! हैराण करणारे फोटो पाहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.