Pune Rain News : पुणे जिल्ह्यात २५९ मिलिमीटरची पावसाची नोंद

वेल्हे तालुक्यात सर्वाधिक : सरासरीच्या तुलनेत टक्केवारी ९३
pune rain update pune district recorded 259 mm of rain velhe monsoon weather
pune rain update pune district recorded 259 mm of rain velhe monsoon weathersakal
Updated on

पुणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना कोरडा ठणठणीत गेला असला तरी जूलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. यानुसार जुलै जिल्ह्यात २५९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

पावसाचे हे प्रमाण जिल्ह्यातील या महिन्यातील सरासरी पावसाच्या ९३ टक्के इतके असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात सर्वाधिक १०३१ मिलिमीटर पाऊस हा वेल्हे तालुक्यात झाला असून, सर्वात कमी म्हणजे केवळ ३९ मिलिमीटर पाऊस हा बारामती तालुक्यात नोंदला गेला आहे.

आतापर्यंत झालेल्या एकूण पावसापैकी जून महिन्यात केवळ ५१ टक्के पाऊस झाला होता. पुणे जिल्ह्याचा जून महिन्याचा सरासरी पाऊस हा १७६ मिलिमीटर इतका असून, या महिन्यात प्रत्यक्षात केवळ ९१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाच्या या आकडेवारीवरून जून महिन्यात निम्मा जिल्हा हा कोरडा ठणठणीत राहिल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्याचा जुलै महिन्याचा सरासरी पाऊस हा २७९ मिलिमीटर इतका असून आजअखेरपर्यंत (ता.२९) प्रत्यक्षात २५९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी १ जूनपासून पावसाची नोंद केली जाते.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

भोर - ४७५

वेल्हे -१०३१

मुळशी - ५४५

मावळ - ९०१

हवेली - ११३

खेड -१८३

आंबेगाव - २७३

जुन्नर - १५३

शिरूर - ६७

पुरंदर - ६१

दौंड - ७०

बारामती - ३९

इंदापूर - ९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.