Pune Rain News : पुण्याला पावसाने झोडपले; घरांमध्ये शिरले पाणी; विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, ४५ ठिकाणी पडली झाडे

Pune rain update in marathi | रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील काही सोसायट्या आणि वस्त्यांमधील घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
pune rain update water entering houses three died due to lightning tree fall
pune rain update water entering houses three died due to lightning tree fallSakal
Updated on

Pune : रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील काही सोसायट्या आणि वस्त्यांमधील घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवानांकडून पाणी शिरलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. भिडे पुलाजवळ विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला. तसेच, मागील २४ तासांत ४५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.

शहरात मागील चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे. वारजे परिसरातील स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत, शिवणेतील सदगुरू सोसायटीमध्ये,

सिहंगड रस्त्यावरील सरिता नगरी, एकता नगरी आणि इतर तीन सोसायट्यांमध्ये तसेच नदीपात्रातील रस्ता रजपूत वीटभट्टीजवळ, गंजपेठ, चांदतारा चौक शिवाजीनगर भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

- भवानी पेठेतील गुळ आळी, वटेश्वर भुवन येथे मोठे झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद. झाडाखाली काही वाहने अडकली आहेत.

- वडगाव बुद्रूक, महापालिका मैदान येथे भिंत कोसळली.

- हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने घरात पाणी शिरले.

- वडगाव शेरीतील आनंदनगर बस थांब्याजवळ एका वाहनावर झाड कोसळले. सुदैवाने वाहनातील शाळकरी मुले आणि वाहनचालक सुरक्षित.

- शहरात मागील २४ तासांत आज सकाळी सात वाजेपर्यंत ४५ झाडे पडली

- भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली.

- कोरेगाव पार्क, बर्निंग घाटाजवळ भिंत पडली.

- बावधन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने वाहने अडकली.

- पुलाची वाडी परिसरात वस्तीत पाणी शिरल्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी संसारोपयोगी सामान सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.