Pune Rain Updates: पुढच्या दोन दिवसांमध्ये पुण्यात कसा असेल पाऊस? हवामान विभागाने दिली माहिती
कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य मध्य प्रदेशावर सक्रिय आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट विभागात गुरुवारी (ता. १२) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान विभागाने विभागाने वर्तविली आहे.
पुणेः गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून पुढील दोन दिवस ही उघडीप कायम राहणार आहे. काही ठिकाणी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.