Pune Rains: पुण्यात पावसाचा धुमाकूळ! कालपासून शहरात काय काय घडले? आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या 3 महत्त्वाच्या सूचना

Khadakwasala Dam: शहराच्या अग्निशमन दल नियंत्रण कक्षात गेल्या 24 तासांपासून विविध दुर्घटनांच्या अनेक तक्रार आल्या आहे.
Pune Rains Mansoon 2024
Pune Rains Mansoon 2024Esakal
Updated on

गेल्या 24 तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून, शहराला पावसाने झोडपून काढले आहे. त्या शहरातील विविध रस्त्यांवरून पाणी वाहू लागले आहे. अशात शहरातील अनेक भागांमध्ये पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोर जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

दरम्यान शहराच्या अग्निशमन दल नियंत्रण कक्षात गेल्या 24 तासांपासून विविध दुर्घटनांच्या अनेक तक्रार आल्या आहे. असे असले तरी यामध्ये कुठेही कोणी जखमी वा जिवितहानी झाल्याची माहीत नाही.

शहरात कालपासून काय काय घडले?

  1. बुधवार २४ जुलै २०२४, सात वाजेपासून, गुरुवार २५ जुलै २०२४ पहाटे पाचवाजेपर्यंत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात आलेल्या तक्रारी

  2. शरहात कालपासून आज पहाटे पाचपर्यंत झाडे पडण्याच्या एकूण 38 घटना घडल्या आहेत.

  3. भवानी पेठेत वाड्याची भिंत व कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक एक भिंत पडली आहे.

  4. वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटी, शिवणेतील सदगुरू सोसायटीत आणि सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये पाणी शिरले.

सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.

Pune Rains Mansoon 2024
Pune Schools Closed: पुण्याला रेड अलर्ट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

दरम्यान खडकवासला धरणातून सध्या २२ हजार ८८० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने तो पुढे ४० हजार क्यूसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, व आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रात ८ हजार २७० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी काठच्या गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Rains Mansoon 2024
Pune Rain: अतिमुसळधार पावसाने झोडपले! मध्यरात्री पीएमसी पुणेकरांच्या मदतीला; जारी केली आपत्कालीन हेल्पलाइन, पर्यटकांनाही इशारा

खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला

25 जुलै रोजी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असणारा आहे. तो सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

शहरातील पुढील ठिकाणी दक्षता घेण्यात यावी संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध

  • भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे.

  • गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर.

  • शितळा देवी मंदिर डेक्कन.

  • संगम पूल पुलासमोरील वस्ती

  • होळकर पूल परिसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com