पुणे : रामनदीत ‘कमळ सरोवर’ साकारण्यासाठी कमळांचे रोपण

नदीच्या उगम क्षेत्रातील खाटपेवाडी तलावात ‘कमळ सरोवर’ साकारण्यासाठी कमळांचे रोपण नुकतेच करण्यात आले आहे.
ramnadi
ramnadisakal
Updated on

पुणे : किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने गेली ३५ महिने ‘रामनदी पुनरुज्जीवन अभियान' राबविले जात आहे. अतिक्रमण, अस्वच्छता, प्रदूषण आणि राडारोड्याच्या विळख्यात सापडलेल्या १९ किलोमीटरच्या दुर्लक्षित राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी नवनवीन प्रयोग सातत्याने करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नदीच्या उगम क्षेत्रातील खाटपेवाडी तलावात ‘कमळ सरोवर’ साकारण्यासाठी कमळांचे रोपण नुकतेच करण्यात आले आहे.

विदर्भातील खामगाव येथील पर्यावरणप्रेमी संजय गुरव यांच्या सहयोगाने हा प्रयोग करण्यात आला आहे. तसेच हा हा प्रकल्प साकारण्यात संदेश गुरव, सुवर्णा भांबुरकर, अर्जुन नाटेकर, नयनीश देशपांडे, ईश्वरी बाविस्कर आणि अनुप गिते यांनी पुढाकार घेतला होता. राम नदी या प्रयोगांतर्गत भुकूम येथील खाटपेवाडी तलावात कमळांचे रोपण तीन प्रकारात म्हणजेच कमळाच्या बिया, रोपे व ट्युबर अशा एकूण ७६ कमळांची लागवड करण्यात आली आहे. गोणपाटाच्या कापडात माती व बिया यांची पुरचुंडी, सुगड्यासाठी वापरलेल्या मडक्यात माती व रोपे, आणि टोपलीमध्ये ट्युबर लावून तळातील चिखलयुक्त जमिनीमध्ये रोपण करण्यात आले.

ramnadi
बिग बॉसमधल्या अभिनेत्रीनं धर्मासाठी सोडलं बॉलीवूड, हिजाबचं समर्थन

या बाबत संजय गुरव यांनी सांगितले की, ‘मी चित्रकलेचा शाळा शिक्षक आहे. छंद म्हणून कमळ सरोवरांचा प्रसार आणि प्रचार गेली अनेक वर्षे करीत आहे. राम नदी पुनरुज्जीवना बद्दलची माहिती मिळाल्यावर उगम स्थानाचे पाणी शुध्द व्हावे यासाठी काही करण्याची इच्छा होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे. पुढील सहा-सात महिन्यांत या तलावात बियांच्या माध्यमातून फुल धारणा होईल.’’

‘कमळाची निवड का ?

कमळ ही एक जलचर औषधी वनस्पती आहे. अध्यात्मात कमळाचे अनन्य साधारण महत्त्व असून ते फलदायीपणा, संपत्ती, ज्ञान व प्रकाश यांचे प्रतीक मानले जाते. कमळ पाण्याच्या निर्जंतुकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावते, जलस्त्रोतांमध्ये नायट्रोजन संतुलन राखण्यास मदत करते. भरपूर नायट्रोजन वापरण्याव्यतिरिक्त, वनस्पतिजन्य जीवाणूंसाठी निरोगी वातावरण तयार करते जे नायट्रोजनचे विघटन करण्यास मदत करते. असेही गुरव म्हणाले.

‘‘राम नदी पुनरुज्जीवित व्हावी, तीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे अविरल व निर्मळ व्हावा यासाठी अनेक संस्था, विद्यार्थी व नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. जगातील शास्त्रज्ञ असे मानतात की ‘लोटस फॅब्रिक’मध्ये अद्वितीय गुणधर्म आहेत. हे कदाचित जगातील सर्वात ‘पर्यावरणीय फॅब्रिक’ आहे. पुण्यातील पहिले कमळ सरोवर राम नदीच्या उगम स्थानी होत आहे याचा आम्हाला विशेष आनंद आहे.’’

- वीरेंद्र चित्राव, संयोजक-राम नदी पुनरुज्जीवन अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()