Global Transport Congestion : जागतिक वाहतुक कोंडीत पुणे सहाव्या क्रमांकावर; डच संस्थेचा अहवाल

जगातील सर्वाधिक वाहतुक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातील बंगळुरु शहराचा पाचवा, तर त्या पाठोपाठ पुणे शहराचा सहावा क्रमांक लागला आहे.
Pune Traffic
Pune Trafficsakal
Updated on
Summary

जगातील सर्वाधिक वाहतुक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातील बंगळुरु शहराचा पाचवा, तर त्या पाठोपाठ पुणे शहराचा सहावा क्रमांक लागला आहे.

पुणे - जगातील सर्वाधिक वाहतुक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातील बंगळुरु शहराचा पाचवा, तर त्या पाठोपाठ पुणे शहराचा सहावा क्रमांक लागला आहे. या क्रमवारीमध्ये लंडन प्रथम क्रमांकावर असल्याचा निष्कर्ष एका डच संस्थेच्या अहवालातून पुढे आला आहे.

जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरांमधील वाहतुक कोंडीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम "टॉम टॉम' नावाची डच संस्था करते, सर्व्हेक्षणानंतर संबंधित संस्था त्यांचा अहवाल प्रसिद्ध करते.

संस्थेने नुकताच जगभरातील वाहतुक कोंडीने ग्रासलेल्या शहरांची नावे, संबंधित शहरामध्ये 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणार वेळ आणि त्यामध्ये संबंधित शहराचा कितवा क्रमांक लागतो, हे त्यांच्या अहवालातुन मांडले आहे. संबंधित अहवालामध्ये सर्वाधिक वाहतुक कोंडी असणाऱ्या शहरामध्ये लंडन प्रथम क्रमांकावर तर बंगळुरु शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे पाचव्या क्रमांकावर असून मनिला नवव्या स्थानावर, तर दिल्ली 17 व्या स्थानावर असल्याचे नमूद केले आहे.

पुणे शहरात मागील वर्षांपासून एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला येणाऱ्या मर्यादा, पायाभुत सोई-सुविधांच्या कामांमुळे वाहतुकीत येणाऱ्या अडचणी, पावसाळ्यात पाणी साठण्यामुळे होणारी तारांबळ अशा अनेक कारणांमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. दरम्यान, मागील वर्षी पावसाळ्यात एका आंतराराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर वाहतुक कोंडीमुळे स्वतःचे खासगी वाहन सोडून रिक्षाने जाण्याची वेळ आली होती. त्याबाबत त्याने ट्‌विटरवर आपला अनुभव मांडला होता. त्यानंतर आता संबंधित संस्थेच्या अहवालातुन पुन्हा एकदा पुण्याच्या वाहतुक कोंडीची सद्यस्थिती दाखविण्यात आली आहे.

क्रमांक शहर प्रति 10 किलोमीटर प्रवासासाठी लागणारा वेळ

1 - लंडन 36 मिनीटे 20 सेकंद

2 - बंगळुरु 29 मिनीटे 10 सेकंद

3 - डबलीन 28 मिनीटे 30 सेकंद

4 - सॅपोरो 27 मिनीटे 40 सेकंद

5 - मिलान 27 मिनीटे 30 सेकंद

6 - पुणे 27 मिनीटे 20 सेकंद

7 - बुशारेस्ट 27 मिनीटे 20 सेकंद

8 - लिमा 27 मिनीटे 10 सेकंद

9 - मनिला 27 मिनीटे

'पुणेकरांचा वाहतुक कोंडीमध्ये वेळ वाया जातो, ते कमी व्हायला पाहीजे. त्याकडे राज्यकर्त्यांनी बघितले पाहीजे. पालकमंत्र्यांनीही त्यामध्ये लक्ष दिले पाहीजे. आमच्या सरकारमध्ये आम्ही दर आठवड्याला बैठक घेत होतो. उद्याची 50 वर्ष लक्षात घेऊन उड्डाणपुल, मेट्रो पुलाची कामे झाली पाहीजेत, त्यासाठी बैठका घेतल्या पाहीजेत. यासंदर्भात मी स्वतः नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहे.'

- अजित पवार, विरोधी पक्षनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.