Pune: रणरागिनी एकवटल्या, इंदापूरमधील वीस हजार महिलांची साखळी

उमेद राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियातंर्गत तालुक्यात दोन हजार बचत गट स्थापन केले आहेत.
Pune
PuneSakal
Updated on

कळस - बचत गटाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात सुमारे २० हजार महिला एकत्रित आल्या आहेत. बचत गटाकडून मिळालेले कर्जातून उभारलेल्या उद्योगातून त्यांना हमखास उत्पन्नाची उमेद गवसली आहे. उमेद राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियातंर्गत तालुक्यात दोन हजार बचत गट स्थापन केले आहेत.

Pune
Mumbai News : आयएसआयएस महाराष्ट्र मोडूयुल प्रकरणात आयएनएची छापेमारी

यातून तालुक्यातील सुमारे २० हजार महिलांची साखळी तयार झाली आहे. या बचत गटांना गेल्या चार महिन्यांत वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून १ कोटींहून अधिक कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बाजारपेठेतील मागणीवर आधारित उत्पादन व शेती पूरक व्यवसायांची गटातील महिलांनी निवड केली आहे.

फास्टफुड, हॉटेल यांसारख्या व्यवसायाची काहींनी निवड केली आहे. महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ व वस्तू वेगवेगळ्या प्रदर्शनातून विक्री करण्याबरोबर त्यांना स्थानिक बाजारपेठही उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली आहे.

Pune
Pune Solid Waste : पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन होणार हायटेक

जेजुरी येथे नुकताच झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमादरम्यान इंदापुरातील महिला बचत गटांनी सहभागी होऊन स्टॉलवर विविध खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री केली. पर्स, हँडमेड ज्वेलरी, मसाले, सेंद्रिय गूळ, बेसन पीठ, शेंगदाना लाडू, राजगिरा लाडू यांसारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली.

यामध्ये काही तासांत सुमारे ४५ हजार रुपयांचा माल हातोहात विकला गेला. शेळी व कुक्कुट पालन, मसाले, पापड, लोणचे, सेंद्रिय गूळ, आर्युवेदिक केस तेल, इमिटेशन ज्वेलरी, कापडी पिशवी हे व्यवसाय आहेत.

उमेद अंतर्गत तालुक्यातील महिलांना एकत्रित करून, त्यांचे बचत गट स्थापन करणे, त्यांना बचतीची सवय लावणे, व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे या गोष्टींसाठी तालुका स्तरावर उमेदचा अभियान व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे.

Pune
Mumbai News : आयएसआयएस महाराष्ट्र मोडूयुल प्रकरणात आयएनएची छापेमारी

या कक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय प्रभाग समन्वयक व प्रत्येक गावामध्ये समुदाय संसाधन व्यक्तीची (सीआरपी) नेमणूक केली आहे.]

सीआरपीच्या माध्यमातून बचत गटातील महिलांची बैठक घेणे, गटातील जमा-खर्चाचा हिशोब ठेवणे, बँकेतून कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामे केली जात आहेत. यामुळे महिलांना बचतीचा व गरजेच्या वेळी मदतीचा आश्वासक आधार मिळाला आहे.

बचत गटांचा आढावा...

बचत गट संख्या - दोन हजार

एक टक्का व्याजदर

३० लाखांचे खेळते भांडवल

प्रति बचत गट - ६० हजार निधी

एकूण ८४ लाख समुदाय गुंतवणूक निधी

‘उमेद’च्या माध्यमातून महिला कमावत्या झाल्या आहेत. कुटुंब सांभाळत व्यवसायाच्या माध्यमातून प्रपंचाला आर्थिक टेका देण्याचे काम त्यांनी केले आहे.

महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचेही आमचे प्रयत्न असतात. यातून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळावे हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- सचिन बाबर, अभियान व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.