धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर काका, चुलत भावाकडूनच लैंगिक अत्याचार! वडिलांचे देखील क्रूर कर्म

Pune Crime News: हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस तक्रारीची सत्यता पडताळणी करणार आहे. 
Pune rape News:
Pune rape News:esakal
Updated on

पुणे: हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर काका व चुलत भावाने  लैंगिक अत्याचार केल्याचा, तर वडिलांनी ही अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी  हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी करण्यात येणार आहे.

हडपसर पोलिस ठाण्यात १३ वर्षी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरून  काका, चुलत भाऊ व वडील यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते जून २०२४ या कालावधीत घडला आहे.

पीडित मुलीचे आई, वडील आणि काका, चुलत भाऊ असे एकत्र कुटुंब हडपसर जवळील एका गावात वास्तव्यास आहे. हे कुटुंबीय परप्रांतीय आहे. जुलै २०२२  मुलीच्या चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. (pune crime news)

Pune rape News:
Pune Drugs Case: पुण्यात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? पोलिसांचे निलंबन होणार?

तर, जानेवारी २०२४  मध्ये पीडित मुलीच्या काकानेही बलात्कार केला. त्यानंतर मुलीची आई काही कामानिमित्त गावी गेली असताना, तिच्या वडिलांनी ही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली होती. त्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला, त्यानंतर तिच्या आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली.

Pune rape News:
Pune Drug Case: पुण्याचा उडता पंजाब! पोर्शे कार प्रकरणानंतर एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.