RBI Withdrawal 2000 Note : हॉटेल बिलिंगवेळी होत आहे गुलाबी नोटांचे दर्शन

हॉटेलमध्ये गेलात अन्‌ बिल पाचशे रुपयांच्यावर झाले, तर नकळत खिशातून एक गुलाबी रंगाची नोट म्हणजे दोन हजार रुपयांची नोट वेटरकडे सरकवली जात आहे.
rupees 2000 note
rupees 2000 notesakal
Updated on

पुणे - हॉटेलमध्ये गेलात अन्‌ बिल पाचशे रुपयांच्यावर झाले, तर नकळत खिशातून एक गुलाबी रंगाची नोट म्हणजे दोन हजार रुपयांची नोट वेटरकडे सरकवली जात आहे. होय, रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिक आपल्याकडे असणाऱ्या मोजक्या नोटा संपविण्याच्या प्रयत्नात आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर दोन हजार रुपयांच्या काही मोजक्या नोटा विविध व्यवहारदरम्यान वापरून संपविण्याकडे सर्वसामान्यांचा कल असल्याचे पाहायला मिळते आहे. एरवी हॉटेलमधील बिल देतानाही ऑनलाइन पेमेंट किंवा कार्ड वापरणारे ग्राहक आता दोन हजारांची नोट बाहेर काढून बिल देत असल्याचे निरीक्षण हॉटेल व्यावसायिकांनी नोंदविले आहे.

पुणे रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ‘शहरातील विविध हॉटेल्समध्ये शुक्रवारी रात्रीपासून ग्राहकांकडून बिल भरताना दोन हजार रुपयांच्या नोटा वापरल्या जात आहे. अर्थात, हॉटेल व्यावसायिक या नोट स्वीकारत असले तरीही ग्राहकांकडून बिल भरताना येणाऱ्या नोटांच्या तुलनेत उर्वरित रक्कम परत देताना काऊंटरवर सुटे पैसे मर्यादित असतात. त्यामुळे अनेकवेळा हॉटेल चालकांचाही नाइलाज होत आहे.’

सध्यातरी पुण्यातील हॉटेल व्यावसायिक दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत, परंतु हॉटेल चालकांनी आपापल्या सनदी लेखापालांशी (सीए) चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, असे शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना सूचविण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

rupees 2000 note
RBI Withdrawal 2000 Note : राष्ट्रवादीने घेतली दोन हजाराची नोटची शोकसभा

खरेदीच्या निमित्ताने दोन हजार बाहेर

मराठी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे म्हणाले, ‘ग्राहक बिल भरताना दोन हजार रुपयांची नोट पुढे करत असल्याचे वास्तव आहे. हॉटेलबरोबरच विविध प्रकारची बिल भरताना आपल्याकडे असणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटा लवकरात लवकर संपविण्यावर नागरिकांचा भर आहे. दरम्यान, हॉटेलमध्ये शनिवारी दुपारपर्यंत तरी बिल भरताना ग्राहकांकडून दोन हजाराची नोट दिली जात होती, परंतु हॉटेलमध्ये बिल भरताना या नोटांचा होणारा वापर कसा असेल, याबाबतचे चित्र येत्या काही दिवसांत अधिक स्पष्ट होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.