पुण्यात कोरोनाची संख्या वाढतीच; आज 7,984 रूग्णांची नोंद

वाढत्या रूग्णसंख्येमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.
Corona Patient
Corona Patientsakal media
Updated on

पुणे : पुणे शहरातील (Pune Corona Updates ) कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. दरम्यान, सोमवारी पुणे शहरात 7,984 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे तर, 14 जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये 7 जण पुणे महापालिका हद्दीतील, 2 जण पिंपरी महापालिका, तर 3 जण पुणे जिल्ह्यातील आहेत. (Pune Corona Latest News In Marathi)

पुणे : दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या संसर्गाची तीव्रता कमी

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटर लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या नगण्य आहे. यामुळे पुणेकरांना घाबरून जाऊ नये, लसीकरण हे कोरोनावरील प्रभावी अस्त्र असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.(corona second wave)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात संसर्गाचा दर २३.९ टक्के होता. तोच दर आता २९.५ टक्के आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा सध्या संसर्गाचा दर अधिक आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनवरील रुग्णांची संख्या १४.१ टक्के होती. ती आता अवघी ०.५८ टक्के आहे. व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या त्यावेळी १.८ टक्के होती. ती आता ०.०१ टक्के इतकी कमी झाली आहे.

Corona Patient
'सपा'ची पहिली यादी जाहीर; भाजपा म्हणते, लिस्ट नई, अपराधी वही!

ओमिक्रॉनमुळे कोरोना संसर्गाचा देशभरात सामुदायिक प्रसार

सध्या दिवसेंदिवस कोरोना संसर्ग देशभरात झपाट्याने वाढत असून रोज हजारो नवीन रुग्णांची वाढ होताना आपल्याला दिसत आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोना संसर्गाचा देशभरात सामुदायिक प्रसार होत आहे असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्याबाबात केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर केली आहे. ( Corona Updates)

या आकडेवारीनुसार 13 जिल्ह्यातील प्रतिदिन कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा 10 टक्क्याने अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग हा एका महिन्याच्या आत 2 जिल्ह्यापासून वाढत जाऊन 33 राज्यातील 410 जिल्ह्यातील आठवड्याच्या पॉझिटिव्हीटी रेट पेक्षा जास्त झाला आहे. हा आकडा चिंताजनक असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.