नोकरी जाण्याची भीती, पगार कपात अन् त्यात आता रोजच...

pet.jpg
pet.jpg
Updated on

पुणे : लॉकडाउनच्या नियमावलीतील काही निर्बंध शिथिल केल्यानंतर पेट्रोल-डीझेलचे दर गगनाला भिडल्याचे गेल्या दोन महिन्यातील दरवाढीवरून पहायला मिळते. एक जूनपासून  31 जुलैपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 19.76 रुपयांनी वाढ झाली आहे. नोकरी जाण्याची भीती, पगार कपात आणि व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे नागरिक आधीच चिंतेत असून सततची इंधनदर वाढ त्यात भर घालत आहे.

लॉकडाऊनमुळे सध्या बहुतांश नोकरदार हे घरून काम करत आहेत. तर उद्योग-व्यवसायाबाबत काही बंधने असल्याने तेथीलही काही कर्मचारी घरीच आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा थेट फटका सहन कराव्या लागणाऱ्या नागरिकांची संख्या सध्या कमी आहे. मात्र ज्याचे पूर्ण क्षमतेने काम सुरु झाले आहे व पूर्वीइतकाच प्रवास करावा लागत असलेल्या वाहनचालकाचे या दरवाढीने अक्षरशः कंबरडे मोडले आहे.

कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर घरून काम करणाऱ्या नोकरदारांना तसेच उद्योग-व्यवसायातील कर्मचाऱ्यांना जेव्हा कामावर जाण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना या वीस रुपये दरवाढीच्या फटका सहन करावा लागणार आहे. इंधन दरवाढ जरी टप्प्याने झाली असली तरी त्याचे परिणाम अनेक वाहनचालकांना एकदमच सहन करावे लागणार आहे. कारण लॉकडाउन काळात अनेकांची वाहने ही घरीच होती. त्यामुळे आता जे कोणी दोन महिन्यांच्या कालावधीनंतर नियमित इंधन भरण्यासाठी जाणार आहेत त्यांच्या खिशाला मोठी चाट बसणार आहे.

जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 18.44  रुपयांनी तर जुलैमध्ये 1.32 रुपयांनी वाढ झाली आहे. यात डिझेल सर्वाधिक 11.68 रुपयांनी तर पेट्रोल 8.08 रुपयांनी वाढते आहे. आज शहरात पेट्रोल 86.89 रुपये डिझेल 78.67 रुपये प्रति लिटर आहे. तर सीएनजीचा दर 54.80 रुपये किलो आहे. 

या कारणांमुळे झाली दरवाढ
- अनलॉकमुळे देशात इंधनाची अचानक वाढलेली मागणी
- राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) सरकारने अधिभार वाढवला 
- आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत असून, कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढत आहेत
- इंधन घेऊन आलेले जहाज लॉकडाउन काळात समुद्रात थांबून होते

महिना           इंधन                 दरवाढ (रुपयांत)
जून              पेट्रोल                08.08  
                    डिझेल              10.36 
                    एकूण                18.44 

जुलै               पेट्रोल                स्थिर 
                    डिझेल             01.32 
                     एकूण             01.32 
एकूण दरवाढ  पेट्रोल             08.08
                     डिझेल           11.68                           

(किंमत वाढलेल्या तारखा. याचा ग्राफ करता येईल) 
तारीख       पेट्रोल            डिझेल        
1 जून       78.09        66.99
7             78.67         67.55
8             79.25         68.11
10            80.15       69.07
12           81.27        70.17
14           82.43        71.31
16          83.34         72.39
18          84.38        73.54
20          85.41        74.69
22         86.06.        75.89
27           86.84        77.33
1 जुलै       86.89       77.35
7             86.89        77.60
12           86.89        77.75
18           86.89        78.28
25           86.89          78.67

येत्या महिन्याभरात पेट्रोलच्या किमती वाढण्याची शक्‍यता नाही. उलट दर कमी होतील. तर युरो सिक्स डिझेल तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे डिझेलचे दर कमी होण्याऐवजी काही पैशांनी वाढू शकतात. राज्य सरकार कोविड-19, दुष्काळ, शिक्षण, स्वच्छ भारत असा कारणांसाठी इंधनावर सेस आकारत आहे. तो कमी केला तर राज्यात इंधनाच्या किमती सुमारे दहा रुपयांनी कमी होऊ शकतात.-अली दारूवाला, प्रवक्ते, आॅल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()