पुणे : निर्बंध जोमात; व्यावसायिक कोमात

लॉकडॉऊनच्या निर्बंधांमुळे शहरातील पथारी-स्टॉल व्यावसायिक, व्यापारी वर्ग आणि हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.
Pune Lockdown
Pune LockdownSakal
Updated on

पुणे - लॉकडॉऊनच्या (Lockdown) निर्बंधांमुळे (Restriction) शहरातील पथारी-स्टॉल व्यावसायिक, (Businessman) व्यापारी वर्ग आणि हॉटेल (Hotel) व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची (Corona Patient) संख्या कमी होऊनही व्यवसायाची वेळ वाढत नसल्यामुळे त्यांच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आत्मदहनाच्या प्रयत्नाची घटना घडूनही प्रशासन मख्ख कसे, असा प्रश्नही व्यावसायिकांना पडला आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे शहरातील अर्थचक्र विस्कळित झाले असून, ही अनिश्चितता दूर कधी होणार, असाही व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच, लसीकरणाच्या मोहिमेनेही वेग घेतला आहे. रुग्णसंख्या जास्त असताना दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची प्रशासनाने परवानगी दिली. शनिवार, रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने आणि हॉटेलमधून पार्सल व्यवस्था सुरू आहे. मात्र, आता सणांचे दिवस जवळ येत असल्याने नागरिकांना खरेदी करायची आहे. त्यासाठी ते सकाळी घरातील कामे आटोपून दुपारी बारानंतर घराबाहेर पडतात. त्यामुळे दुपारी दोन ते सायंकाळी चारदरम्यान बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या बाबतच्या पत्रकावर कमल व्यवहारे, संजय बालगुडे, बाळासाहेब अमराळे, शिवा मंत्री यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहर भाजपनेही व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला या पूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे.

Pune Lockdown
घरासह महागड्या कारमध्येही गावठी दारुचा बेकायदा साठा; महिलेसह दोघांना अटक

पालकमंत्री आज निर्णय घेणार?

निर्बंध शिथिल करण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आदींची गुरुवारी भेट घेतली. त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत भावना पोचविण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया तसेच राहुल हजारे, नितीन काकडे, मनोज सारडा, अजित सांगळे, अभय बोरा आदींचा समावेश होता.

दरम्यान जाणीव हातगाडी, फेरीवाले, पथारी संघटनेचे कार्यवाह संजय शंके यांनीही व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शहर आणि उपनगरांत आजही सायंकाळी चारनंतर अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. काही ठिकाणी पोलिसांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. मात्र, शुक्रवारीही सायंकाळी चारनंतर दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्धार महासंघाने व्यक्त केला.

पोलिस, पालिकेची कारवाई

दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सायंकाळी चार वाजेपर्यंत आहे. त्यानंतर व्यवसाय बंद करण्यास व्यावसायिकांना थोडा वेळ लागतो. परंतु, लगेचच पोलिस किंवा महापालिकेकडून कारवाई होत आहे. प्रसंगी पाच हजार रुपयांचा दंडही वसूल केला जातो. त्यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

कर्जाचे हप्ते, कर भरणा

व्यवसायाची वेळ सायंकाळी चार वाजेपर्यंत असल्यामुळे व्यावसायिकांचा व्यवसाय नेहमीपेक्षा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. मात्र, कर्जाचे हप्ते, विविध प्रकाराचे कर, वीज बिल यांचा भरणा करणे त्यांना क्रमप्राप्तच ठरत आहे. त्यात कोणतीही सवलत मिळालेली नाही. त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मॉलचालकांचे आंदोलन

शहरातील मॉल्स अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या बाबत राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ अमनोरा मॉलमध्ये विविध मॉल्समधील विविध व्यावसायिक,कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता आंदोलन करणार आहेत.

राजकारण्यांकडून टोलवाटोलवी

व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या बाबत निवेदन दिले आहे, तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही व्यवसायावरील निर्बंध शिथिल करण्याचे आश्वासन दिले. परंतु, अद्याप त्याबाबत पूर्तता झालेली नाही.

Pune Lockdown
वीजबिलांचे दरमहा दहा हजारांवर ग्राहकांचे चेक होतात बाऊन्‍स

नागरिक म्हणतात..

मी वारजे येथे राहतो. मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यांच्यासाठी खरेदी करावी लागते. सगळ्याच गोष्टी आमच्या येथे मिळत नाहीत. त्यासाठी शहराच्या मध्यभागात यावेच लागते. परंतु, पोचेपर्यंत दुकाने बंद होतात. त्यामुळे अनेकदा कामाचा खाडा करून खरेदीला जावे लागते.

- सुशांत जाधव, नागरिक

घरातील कामे बाजूला ठेवून सकाळीच खरेदीला जावे लागते. त्यामुळे कामाची गैरसोय होते. किती काळ असे चालणार, या चिंतेमुळे अस्वस्थ वाटू लागले आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झालेल्या ठिकाणी निर्बंध कमी करायला काय हरकत आहे?

- विशाल गुजराथी, नागरिक

सासू- सासरे, मुले यांच्यासाठी खरेदीला बाहेर पडावे लागते. गेल्या दीड वर्षांपासून घरगुती समारंभ बंद पडले आहेत. बारसे, डोहाळ जेवण करण्यासाठी काही खरेदी करायची म्हटल्यास स्वयंपाक कधी करणार, बाहेर कधी जायचे, असे प्रश्न पडतात. आमचे लशीचे दोन्ही डोस झाले आहेत. सरकारने आता त्याचा विचार करून फिरण्यास परवानगी द्यावी.

- शीला शर्मा, नागरिक

Pune Lockdown
रो हाऊससाठी गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

व्यावसायिक म्हणतात...

माझे हार्डवेअरचे दुकान आहे. गेल्या १९ महिन्यांपासून व्यवसायाचा खेळखंडोबा झाला आहे. कामगारांचे पगार द्यावेच लागतात. लाइट बिल, मिळकत कर, बॅंकांचे हप्ते यांचे ओझे डोक्यावर आहेच. प्रपंचाचाही खर्च आहे. आता सगळे कसे चालवायचे, हे सरकारनेच सांगावे.

- नीलेश शहा

मोबाईल दुरुस्तीचे माझा व्यवसाय आहे. अनेक महिने दुकान बंद होते. त्यामुळे घरात अडचण झाली आहे. बचतही संपली आहे. ग्राहक येत आहेत, त्यामुळे व्यवसाय करावाच लागतो. मात्र, वेळेच्या बंधनांमुळे खूप गैरसोय होते. बॅकलॉग भरून कसा काढायचा, हा प्रश्नच आहे. दुकाने बंद करून कोरोना दूर होणार आहे का?

- अभिजित मुळे

आमचा सलूनचा व्यवसाय आहे. आम्हाला सर्वांत शेवटी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यातही आता वेळेची आडकाठी आहे. पुढाऱ्यांचे दौरे, मेळावे, कार्यक्रम होत आहेत. मात्र, आम्हाला चार वाजता दुकान बंद करून घरात बसण्यास का सांगितले जाते?

- रवी जाधव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()