Pune: रसशाळा ते वारजे रस्ता झाला चकाचक; क्षेत्रीय कार्यालयाची विशेष मोहीम

Pune: राऊत प्रमुख आरोग्य निरीक्षक आय. एस.इनामदार यांचे सूचनेनुसार स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
Pune: रसशाळा ते वारजे रस्ता झाला चकाचक; क्षेत्रीय कार्यालयाची विशेष मोहीम
Updated on

Shivne: कर्वे रस्त्यावरील रसशाळा ते गणपती माथा सात किलोमीटर रस्ता चकाचक करण्यात आला. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा २०२४ या मोहिमे अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

न्यू कोपरे गावातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महापालिका सहायक आयुक्त विजय नायकल यांनी हार अर्पण केला. यावेळी भगवान गायकवाड उपस्थित होते. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम, उपायुक्त आशा राऊत प्रमुख आरोग्य निरीक्षक आय. एस.इनामदार यांचे सूचनेनुसार स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

Pune: रसशाळा ते वारजे रस्ता झाला चकाचक; क्षेत्रीय कार्यालयाची विशेष मोहीम
Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संपूर्ण कर्वे रस्ता रसशाळा ते गणपती माथा परिसरात सूक्ष्म क्लिनिंग करण्यात आला आहे. यासाठी मंगळवारी मध्यरात्री नंतर हि मोहीम सुरु झाली. रात्रभर आरोग्य निरीक्षक, मोकदम, झाडून काढणारे रस्त्यावर ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात येत होती. या सात किलोमीटरच्या टप्प्यामध्ये रस्ता स्वच्छ करणे. त्याचबरोबर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजका मध्ये अडकलेली माती खरवडून काढली. यातून सुमारे साडेचार टन ही माती जमा करण्यात आली. दुभाजक, सतत कचरा असणारी ठिकाणे व्यापारी संकुल, अशा ठिकाणावरून सुमारे ८५० किलो सुका कचरा उचलण्यात आला झावळ्या व पालापाचोळा यांचा कचरा एक टन जमा करण्यात आलेला आहे

पटवर्धन बाग व अचानक चौक शिवणे या दोन ठिकाणी सतत कचरा असतो. ही ठिकाणी बंद केली आहेत. या ठिकाणी स्वच्छता करून सुशोभीकरण केले आहे. भारत कांबळे व किशोर मोरे, अमित भोसले व सेवाव्रत फौंडेशन यांचे सहकार्य लाभले. राजपूत विटभट्टी नदीपात्र परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा उचलण्यात आला.

Pune: रसशाळा ते वारजे रस्ता झाला चकाचक; क्षेत्रीय कार्यालयाची विशेष मोहीम
Pune: शाळेच्या प्रशासकाकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

यासाठी लायन्स क्लब, सेंट्रल मॉल व मराठवाडा कॉलेज व ज्येष्ठ नागरिक संघाचे भांडारकार यांचे सहकार्य लाभले. स्वच्छता ही सेवा २०२४ या मोहिमेत आरोग्य निरीक्षक- राजेंद्र वैराट, प्रशांत दामले, वैभव घटकांबळे, राजेश आहेर, प्रदीपकुमार राउत, सचिन सावंत, दत्तात्रय दळवी, नंदा प्रताप यांनी मोकादम प्रमोद चव्हाण, खंडू कसबे, संतोष थोरात, सुनील मोरे, कृष्णा धनगर, अंकुश साठे, सागर राजगुरू, नितेश करडे, संतोष बराटे, शरद पाटोळे, जाकीर शेख, आनंदा धुमाळ, रवी सौदे, रवी ढोर यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. हि मोहिमे यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

विशेष स्वच्छता मोहिमेची ठिकाणे-

-कर्वे रस्ता- स्वातंत्र्य चौक- लागू बंधू मार्गे- एसएनडीटी चौक, कर्वे पुतळा मार्गे वनदेवी मंदिर,

-गुळवणी महाराज रस्ता, समर्थ पथ,

-कर्वेनगर येथील वनदेवी कर्वेनगर चौक मार्गे वारजे वांजळे चौक दरम्यान दोन्ही बाजू,

-वांजळे चौक शिंदे पूल’ उत्तमनगर अचानक चौक, चैतन्य हॉस्पिटल, कोंढवे धावडे, कोंढवा गेट मार्गे १० नं. गेट

Pune: रसशाळा ते वारजे रस्ता झाला चकाचक; क्षेत्रीय कार्यालयाची विशेष मोहीम
Helicopter Crash in Pune: बापरे! ते हेलिकॉप्टर मुंबईत सुनील तटकरेंना घ्यायला जात होतं, त्यापूर्वीच मोठी दुर्घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.