Pune Road Problem : पावसामुळे डबकी साचल्याने नागरिक त्रस्त; मुख्य खाते आणि क्षेत्रिय कार्यालयाचे एकमेकांकडे बोट

रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे महापालिका पथ विभाग आणि धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने दिसून येत आहे.
Pune Road Problem
Pune Road Problemsakal
Updated on

Pune Road Problem - कात्रज आगम मंदिर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साठून खड्डे तयार झाले असून त्यामुळे रस्त्यावर डबकी तयार झाली आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने मच्छर आणि डासांचा त्रास वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Pune Road Problem
Pune : वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत

त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून लवकरात लवकर महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. अशात मात्र, मुख्य खाते आणि क्षेत्रिय कार्यालय एकमेकांकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहे.

रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे महापालिका पथ विभाग आणि धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने दिसून येत आहे. आगम मंदिर येथील बालाजी संकुल रस्त्यावर खूप पाणी असते. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते.

Pune Road Problem
Mumbai Crime : भरदिवसा बॅंकेतून दागिने लंपास, महिलेसह तिच्या मुलाला अटक

पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाण्यासाठी पदपथ तर सोडा साध्या साईडपट्ट्या व्यवस्थित नाहीत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अपंग व वयोवृद्ध लोकांचे खूप हाल होतात. तसेच, शेजारी पिण्याच्या पाण्याचा व्हॉल्व असून त्यामधून सतत पाणी गळती होत असते.

सच्चाईमाता मंदिर परिसर, संतोष नगर, वाघजाईनगर आदी परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देत दुरुस्ती करावी अशी मागणी ॲड. प्रदीप माने यांनी केली आहे.

आगम मंदिर परिसरातील ही समस्या एका दिवसाची नाही. या समस्येचा सामना नेहमी करावा लागतो. यावर महापालिकेने त्वरित उपाययोजना करत या त्रासातून आमची सुटका करावी ही मागणी आहे.

- राजू कदम, स्थानिक नागरिक

---------

ही कामे मुख्य खात्यांतर्गत येत असून याबाबत सबंधित अधिकाऱ्यांमार्फत मुख्य खात्याशी संपर्क आणि पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. - सुरेखा भणगे, सहायक आयुक्त, धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय

-----------

१२ मीटरचा पुढील रस्ते हे मुख्य खात्याच्या अंतर्गत येतात. त्याखालील रस्त्याची दुरुस्ती क्षेत्रिय कार्यालयाने करणे क्रमप्राप्त आहे. क्षेत्रिय कार्यालयाला काही मदत लागली तर आमच्या खात्यामार्फत करण्यात येईल.

- दिलीप पांडकर, उपअभियंता, पथ विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.