Latest Marathi News: चाकण-भांबोली फाटा (ता.खेड ) या मार्गावर नागरिकांच्या विरोधामुळे रखडलेले रस्त्याचे काम नागरिकांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. अनेक ठिकाणी साईडपट्ट्या नसल्याने वारंवार अपघात होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालून तात्काळ रखडलेली कामे मार्गी कशी लागतील ? याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
चाकण ते भांबोली फाटा आणि वासुली फाटा ते करंजविहिरे या मार्गाचे चार ते पाच वर्षांपूर्वी रुंदीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले होते.यातील काही काम करंजविहिरे,आंबेठाण,बिरदवडी आदी परिसरात बाकी आहे.