Pune : दौंड - एकवीस दिवसानंतर पोलिसांना माजी नगराध्यक्ष सापडला

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक
बादशहा शेख
बादशहा शेखsakal
Updated on

दौंड : दौंड शहरात तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्या महिला व तरूणांवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी तथा दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याला पोलिसांनी राजस्थान मधून ताब्यात घेतले आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी आज (ता.२९) या बाबत माहिती दिली. संशयित आरोपी बादशहा आदम शेख व त्याचा सहकारी रमजान (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या दोघांना अजमेर (राजस्थान) येथून आज ताब्यात घेण्यात आले.

दौंड शहरात २० ऑक्टोबर रोजी विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या तरूणी व तिच्या कुटुंबातील सात सदस्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. पीडितेच्या फिर्यादीनुसार माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख याच्यासह एकूण २० जणांविरूध्द ९ नोव्हेंबर रोजी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी १७ नोव्हेंबर रोजी बादशहा शेख याच्या अटकेच्या मागणीसाठी दौंड पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. श्री. राणे यांनी या प्रकरणातील शंशयित आरोपी व काही पोलिस अधिकार्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा जाहीर आरोप केल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली होती.

बारामती येथील अपर व जिल्हा सत्र न्यायालयाने २३ नोव्हेंबर रोजी बादशहा शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता.

पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक केली आहे.

बादशहा शेख याने सलग २९ वर्षे नगरसेवक, दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ५ वर्षे गटनेता, दौंड बाजार समिती स्वीकृत संचालक आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.