ओतूर : डिंगोरे ता.जुन्नर येथील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्ट मधे अश्लील नृत्यांचा कार्यक्रमावर पुणे ग्रामीण पोलिसांचा छापा घातला असून ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीसांनी संयुक्त केली आहे. याबाबत ओतूर पोलीसात सरकार तर्फे पुणे ग्रामीणचे दहशतवाद विरोधी शाखेचे विशाल गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे.
या कारवाईत राधाकिसन झनकर वय ४४,रविंद्र लाड वय ४७,योगेश वाघ वय ४६,अक्षय थोरात वय २६,अतुल जगताप वय २६,भाउसाहेब गाडे वय ३८,शाम चव्हाण वय ४३, अमोल शिंदे वय ३२ , संपत धात्रक वय ४२,योगेश सांगळे वय ३७, सागर उगले वय ३२, किशोर सानप वय ३३, शिवाजी हराळे वय ४५, तन्मय बकरे वय २५, शरद सानप वय ३४, सागर कर्नावत वय ३३, सागर जेजुरकर वय ३५ हे सर्व
सर्व राहणार नाशिक व त्यांच्यासोबत११ महीला तसेच हॉटेल मालक प्रदिप चंद्रकात डहाळे रा. २०३ रिष्दी सिष्टी हाईटस, सेक्टर १९ एरोली नवी मुंबई व हॉटेल मॅनेजर अविनाश अशोक भोगे वय २९ रा. करवंडी ता.जि.अहमदनगर यांचे वर ओतूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की गुरूवारी ता.३० मे रोजी दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह जुन्नर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांचे पथकास ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे या गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्यांचा कार्यक्रम चालू असलेबाबत माहिती मिळाली होती.
सदर मिळालेल्या माहितीवरून पथकाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या स्टाफसह या रिसॉर्टवर छापा टाकून नाशिक जिल्ह्यातील एकूण १७ तरुण तसेच पुणे व इतर जिल्ह्यातील एकूण ११ मुलींना तसेच रिसॉर्टच्या मॅनेजर यास ताब्यात घेऊन अश्लील नृत्याचा कार्यक्रम करत असले प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले प्रकरणी माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टचे मालक प्रदीप डहाळे यांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर बाबत अधिक पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करीत आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक
पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर , स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे,पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, सहायक फौजदार विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार विशाल भोरडे,मोसिन शेख, ओंकार शिंदे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले व शुभांगी दरवडे यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.