वेल्हे,(पुणे ) - पुणे ग्रामीण डाक विभागा अंतर्गत आज १८ जुलै ते २० जुलै या तीन दिवसा दरम्यान "महिला सम्मान बचत पत्र" गुंतवणुकी साठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक बी.पी.एरंडे यांनी दिली असून जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला सन्मान बचत पत्र योजना ०१ एप्रिल २०२३ पासून सर्व डाकघरांमध्ये उपलब्ध आहे. सदर योजना हि महिला व मुलींकरता उपलब्ध असून त्याची मुदत दोन वर्ष आहे. सदर बचत प्रत्रात किमान रु. १०००/- पासून कमाल रु. दोन लाख (रु १०० च्या पटीत) गुंतवणूक करता येईल. एका महिलेच्या नावावर कमाल रुपये दोन लाखांपर्यंत किती हि बचतपत्र घेता येतील पण दोन बचत पत्रांमध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे. व्याजदर प्रती वर्षी ७.५% एवढा असून व्याज चक्रवाढ पद्धतीनी आकारले जाईल.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून या योजनेसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत असून ३२२ शाखा घराच्या माध्यमातून तसेच ५२ उपडाकघराच्या माध्यमातून बचत पत्र मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये सदर योजने संदर्भात माहिती घेऊन बचत पत्र मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अधीक्षक बी.पी .एरंडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
या योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
१) 'सदर योजना हि महिला व मुलींकरता उपलब्ध आहे.
२) सदर बचत पत्र ३१.०३.२०२५ पर्यंत घेता येतील.
३) बचत पत्राची मुदत दोन वर्ष राहील.
४) सदर बचत प्रत्रात किमान रु.१०००/- पासून कमाल रु.दोन लाख (रु १०० च्या पटीत) गुंतवणूक करता येईल.
५) व्याजदर प्रती वर्षी ७.५ % एवढा असून व्याज चक्रवाढ पद्धतीनी आकारले जाईल.
६) एका वर्षा नंतर ४० %रक्कम एकदाच काढता येईल.
७) अपवादात्मक परीस्थिती शिवाय खाते मुदत पूर्व बंद करता येणार नाही .
८) रुपये १ लाख गुंतवणुक केल्यास ११६०२२ एवढी रक्कम परत मिळते.
म्हणजे ८% व्याजदर मिळतो.
तसेच मागील आर्थिक वर्षा मध्ये पुणे ग्रामीण विभागा अंतर्गत रुपये ३९६/- मध्ये रुपये १० लाखांचे २५००० अपघाती विमा उतरवण्यात आले होते तरी आता त्याची मुदत संपत आली आहे त्यासाठी सर्वाना पुन्हा आव्हान करण्यात येते की, आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन रुपये ३९६/- वार्षिक हप्त्यामध्ये १० लाखांचा अपघाती विमा पुनर्जीवित करून घ्यावा तसेच डाक विभागाच्या सामान्य सेवा केंद्र मार्फत सर्व शेतकर्यांनी आपल्या पीकाचा, केवळ एका रुपयामध्ये पीक विमा काढून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान एरंडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.