Pune News: पुण्यात बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमस्थळी हाणामारी; भक्त आणि स्वयंसेवक आपापसात भिडले

पुण्यातील संगमवाडी येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांचा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
bageshwar baba open challenge to annis  demand to make hindu rashtra
bageshwar baba open challenge to annis demand to make hindu rashtraesakal
Updated on

पुणे- पुण्यातील संगमवाडी येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांचा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्वयंसेवक आणि भक्त भिडल्याची माहिती मिळत आहे. स्वयंसेवक आणि भक्तांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आल्याचं कळतंय. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

निकम फार्म, संगमवाडी येथे बागेश्वर बाबा यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यानिमित्त बागेश्वर बाबा सध्या पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. बागेश्वर बाबा यांना भेटण्यासाठी अनेक भक्त दरबारात येत असतात. यावेळी आलेल्या भक्तांचे आणि स्वयंसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीमध्ये झाले. वादाचे कारण समजू शकलेले नाही.

bageshwar baba open challenge to annis  demand to make hindu rashtra
बागेश्वर धाम महाराजांच्या ‘दिव्य दरबार’ला प्रतिसाद

बागेश्वर बाबा यांनी काही दिवसांपूर्वी तुकाराम महाराजांबाबत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती. विविध शहरात भरणाऱ्या बागेश्वर बाबांच्या दरबारात हजारोंच्या संख्येने भक्त येत असतात. महाराष्ट्रातील दोन बड्या राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याचं बागेश्वर बाबा यांनी सांगितलं. हे दोन नेते कोण याबाबत त्यांनी सांगितलं नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.