पुणे : पुण्यातील सरहद या संस्थेने एक हजार अफगाणी विद्यार्थ्यांची मदत करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात एक पत्र सरहद संस्थेने पंतप्रधानांना लिहलंय. श्रीगुरु तेगबहादूरजी यांच्या नावाने अडचणीत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक घेण्यासाठी परवानगी आणि सहकार्याची मागणी या पत्राद्वारे मोदींकडे करण्यात आली आहे. ही मागणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहर, कार्याध्यक्ष सुरेंद्र वाधवा यांनी केली आहे.
काय म्हटलंय पत्रात?
सरहदने म्हटलंय की, एक हजार अफगाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याची सरहदची इच्छा आणि क्षमता सुद्धा आहे. जोवर परिस्थिती सुधारत नाही तोवर सध्याच्या काळात त्यांच्या शिक्षणाची आणि खाण्यापिण्याची जबाबदारी आम्ही उचलू. आम्ही अशा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी केंद्र सरकारची मदत घेऊ आणि त्यानंतर निर्वासितांना आवश्यक मदत दिली जाऊ शकते.
म्हणून परवानगीची आवश्यकता...
अफगाणिस्तानचा मुद्दा स्फोटक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला असल्याने, सरकारच्या परवानगीशिवाय आणि निवडीमध्ये देखील केंद्र सरकारने मदत केल्याशिवाय आम्हाला जे मानवतावादी काम करायचे आहे ते साकार होऊ शकत नाही. खरं तर अशा काळात भारतीय स्वयंसेवी संस्थाकडून दुःखी अफगाणी विद्यार्थी आणि निर्वासितांना मदत भारताच्या व्यापक मानवतावादी दृष्टीकोनाचे उदाहरण बनू शकते. तसेच हे कार्य मानवतेचे रक्षण करण्यासाठी श्रीगुरु तेगबहादूर जी यांच्या शहादत्वाला श्रद्धांजली वाहणार आहे. आम्ही तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की आम्हाला अफगाण विद्यार्थी आणि निर्वासितांना दत्तक घेण्याचे हे काम करण्याची परवानगी द्या आणि निवड प्रक्रियेसाठी प्रतिनिधी नियुक्त करा. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही आमच्या राष्ट्राचा गौरव आणि प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करू.
काय आहे सरहद संस्था?
सरहद ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी गेल्या तीस वर्षांपासून भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये शांततेसाठी कार्यरत आहे. सध्या छोट्या प्रमाणावर संस्था असली तरी, अफगाणी विद्यार्थ्यांना 2008 पासून उच्च शिक्षण देण्यासाठी ही संस्था काम करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.