Pune Sassoon Hospital: रुग्णाला निर्जनस्थळी नेऊन टाकणारा ससूनचा निर्दयी डॉक्टर निलंबित

Pune Sassoon Hospital doctor suspended: सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.
 Sassoon Hospital
Sassoon Hospital
Updated on

पुणे- ससून रुग्णालयाबाबतचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. बेवारस रुग्णांना डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून देत असल्याचं समोर आलं होतं. यामुळेच एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा प्रकार समोर आणला आहे. ससून अनेक गोष्टींसाठी कुप्रसिद्ध होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ससून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती.

 Sassoon Hospital
Sassoon Hospital Pune: ससूनमध्ये धक्कादायक प्रकार! बेवारस रुग्णांसोबत डॉक्टरांचे अमानवी कृत्य; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

ससूनचे डीन म्हणाले की, याप्रकरणाची गंभीर दखल आपण घेतली आहे. संबंधित लोकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिवाय, याप्रकरणी तपास केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदी कुमार या डॉक्टरला निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी आणखी कोणी सहभागी आहे का हे पाहिलं जात आहे.

असा समोर आला प्रकार?

दादासाहेब यांनी एका रुग्णाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण, तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे दादसाहेब यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी सापळा रचला. आणखी एका रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये दाखल केला. त्यावेळी आदी नावाचे डॉक्टर त्याठिकाणी आले आणि त्यांनी रितेश चालवत असलेल्या ऑटोमध्ये बसले. त्यांनी रुग्णाला निर्जनस्थळी सोडले आणि त्यानंतर ते कर्मचाऱ्यासह कारमधून निघून गेले.

 Sassoon Hospital
Sassoon Hospital : नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो.. असा समोर आला ससूनमधील भोंगळ कारभार

दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. त्यानंतर त्यांनी साम टीव्हीला याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ससून प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com