Gas Tanker Accident : पुणे-सातारा महामार्गावर गॅस भरलेला टँकर पलटी; मोठी दुर्घटना टळली

पुणे-सातारा महामार्गावर कापुरव्होळ येथे बुधवार ता. 27 रोजी रात्रीच्या सुमारास भरधाव चाललेला गॅस टँकर नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरच पलटी झाला.
Gas Tanker Overturned
Gas Tanker Overturnedsakal
Updated on

नसरापूर - पुणे-सातारा महामार्गावर कापुरव्होळ येथे बुधवार ता. 27 रोजी रात्रीच्या सुमारास भरधाव चाललेला गॅस टँकर नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरच पलटी झाला. टँकर मध्ये गॅस भरलेला होता सुदैवाने अपघातात टाकी लिकेज न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. दुसरया दिवशी दिवसभर टँकर सरळ करण्याचे प्रयत्न चालु होते.

चेंबुर मुंबई येथुन निघालेला एलपीजी गॅस भरलेला टँकर क्र. एमएच 31 एफसी 4022 वाई, जि. सातारा येथे जात असताना बुधवारी रात्रीच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर कापुरव्होळ ता. भोर गावच्या हद्दीतुन जात असताना टँकरच्या पुढील कारने अचानक ब्रेक दाबल्याने कारला वाचवण्यासाठी टँकर चालक अब्दुल वाजीद यांनी टँकर डाव्या बाजुस घेतला.

परंतु टँकरचा वेग व रस्त्याचा उतार यामुळे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकरची डावी चाके रस्त्याच्या डाव्या बाजुच्या कठड्यावर गेली. त्यामुळे टँकर रस्त्यावरच पलटी झाला. सुदैवाने या अपघातात टँकर चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले.

राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी गणेश लडकत, राजीवडे, खोमणे तसेच महामार्ग वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अस्लम खतिब यांनी कर्मचारयांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या रस्त्यावरील वाहतुक सेवा रस्त्यावर वळवुन महामार्ग मोकळा केला.

टँकरमध्ये सुमारे 19 टन एलपीजी गॅस भरलेला होता. वेगात टँकर पलटी झाल्यावर सुदैवाने टँकरची गॅस टाकी लिकेज झाली नाही. अन्यथा महामार्गवर मोठा अनर्थ घडले असते. दुसरया दिवशी सकाळ पासुन टँकर सरळ करण्यासाठी प्रयत्न चालु होते गॅस लिकेज होऊ नये व सुरक्षित टाकी सरळ व्हावी, यासाठी वाई येथुन एलपीजी कंपनीचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आले होते.

पोलिसांनी सुरक्षिततेसाठी भोर नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी तैनात ठेवला होता. अथक प्रयत्नानंतर पाच क्रेनच्या सहाय्याने दुपारी चार वाजता टँकर सरळ करण्यात यश आले. यानंतर दुर्घटनाग्रस्त टँकर बाजुला घेऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.