SPPU News: विद्यापीठातील बी.एसस्सी ब्लेंडेड आता चार वर्षांचे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाशी हातमिळवणी करत
SPPU News
SPPU NewsSakal
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाशी हातमिळवणी करत चार वर्षाचा बी.एसस्सी ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठात २०१८ वर्षांपासून मेलबर्न विद्यापीठासोबत करार करत तीन वर्षाचा बी.एसस्सी ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू होता,

मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता तो चार वर्षाचा करण्यात आला असून चार पैकी दोन वर्ष विद्यार्थ्यांना मेलबर्न विद्यापीठात पदवी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

SPPU News
Pune News : डीजेचा दणदणाट, वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकाने फोडली १० लाखांची साऊंड सिस्टीम

या चार वर्षीय बी.एसस्सी ब्लेंडेड पदवी अभ्यासक्रमाची घोषणा ९ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड टुरिझम मंत्री डॉन फरेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

मेलबर्न विद्यापीठाने भारतातील तीन विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मद्रास विद्यापीठ, गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट तर महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे.

SPPU News
Pune Crime News: ATM मशीन चोरट्यांनी पळवलं सुपे येथील घटना

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाच्या 'इंटरडीसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सेस' प्रमुख डॉ. अविनाश कुंभार तसेच मेलबर्न विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डंकन मास्केल, मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस. गोवरी, तर गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट प्रा.दयानंद सिद्दावतम आदी उपस्थित होते.

यावेळी मास्केल म्हणाले,‘‘भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग खुला करून देण्याच्या दृष्टीने आम्ही हा करार केला आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांसोबत एकत्र काम करताना आम्हाला आनंद होत आहे.’’

विद्यापीठाने सुरू केलेला हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून सुरू करण्यात येत आहे. यामुळे मेलबर्नसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातही विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.

व्हिसा योजनेअंतर्गत ऑस्ट्रेलियामध्ये रोजगाराच्या संधीही मिळू शकतील. तसेच भारतातील प्राध्यापकांना या विद्यापीठासोबत संशोधन आणि तंत्रज्ञान आदींचे आदानप्रदान करणे शक्य होईल.

- डॉ.कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.