बाऊन्सरची दादागिरी शाळेला भोवणार; निलम गोऱ्हेंचे कारवाईचे निर्देश

Pune
PuneTeam eSakal
Updated on

पुण्यातील क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आता शाळांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण संचालक आणि उपसंचालकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय झाले असून, पुण्यातील ३३ शाळांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील काही शांळांच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

Pune
पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 3,995 पानांचं चार्जशीट दाखल

राज्य सरकारच्या आदेशानुसार १५ टक्के फी वाढ कमी करण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेतील महिला बाऊन्सरने धक्काबुक्की करत काठीने मारहाण (Beating) करण्याचा प्रकार बिबवेवाडीतील कलाईन मेमोरियल स्कुल मध्ये घडला होता. याबाबत पालक मयुरेश गायकवाड यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार (Complaint) केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Pune
तीस वर्षांचा संसार झालेल्या जोडप्याचा कौटुंबिक दावा तडजोडीअंती निकाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.