Pune School Bus Accident : शाळेवरही पोलिसांनी कारवाई करावी; पालकांची मागणी

वाघोली शाळा बस अपघात प्रकरण
pune school bus accident parents demand to action on school also lonikand police
pune school bus accident parents demand to action on school also lonikand policeSakal
Updated on

Wagholi News - शाळेच्या बस अपघात प्रकरणी केवळ चालकाला दोषी न धरता शाळेवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी लोणीकंद पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वाघोलीतील रायझिंग स्टार स्कूलची ही बस होती.

चालकाचा बेजबाबदारपणा व भरगाव वेगाने बस चलविल्यामुळेच बसचा अपघात झाला. या अपघाताने मुलांच्या मनावर खूपच गंभीर परिणाम झाला आहे. मुले भीतीच्या छायेखाली वावरत आहे. यामुळे ते झोपत नसून सारखे रडत आहेत.

मुलांना प्रत्यक्ष जखमा नसल्या तरी मुकामार असण्याची शक्यता आहे. एका मुलावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर एका मुलीला रात्रीच ताप आल्याने पालकांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करावे लागले.

pune school bus accident parents demand to action on school also lonikand police
Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; चालकावर गुन्हा दाखल

बससाठी लागणारे शुल्क शाळाच घेते. यामुळे ही जबाबदारी शाळेची आहे. बस वरील चालक ही वारंवार बदलला जातो. शाळेवर ही पोलिसांनी गुन्हा दाखल करावा असे या पत्रात म्हटले आहे. अपघातावेळी बस मध्ये असलेल्या मुलांच्या पालकांनी हे पत्र पोलिसांना दिले आहे.

pune school bus accident parents demand to action on school also lonikand police
Wagholi News : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालकपदी सारीका हरगुडे यांची बिनविरोध निवड

दैव बलवत्तर म्हणून...

बस वेगाने असल्यामुळेच झाडाला धडकल्याचे  व्हिडीओत दिसून येते. बसची पुढील काच तुटून लांबवर गेली. मुले एकमेकांच्या अंगावर आदळली. नशीब मुले पुढील काचेतून बाहेर फेकली गेली नाहीत. तेथील ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली. दैव बलवत्तर म्हणून मुले वाचली. अपघातानंतर शाळेचे कर्मचारी दीड तासाने आले. शाळा काय फक्त शुल्क घेण्यासाठीच आहे का ? असा संतप्त सवाल पालकांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()