Pune School Girls: पुण्यातील संतापजनक घटनेनंतर फडणवीसांनी दिले मोठे आदेश, आता संस्थाचालकांना...

Fadnavis Issues Major Orders After Shocking Pune Incident: मुलांच्या लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal
Updated on

Pune Child Abuse: पुण्यातील वानवडी येथे सहा वर्षांच्या असलेल्या दोन विद्यार्थीनींचा स्कूल बसच्या ड्रायव्हरने लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ड्रायव्हर संजय जेटिंग रेड्डी याला अटक करण्यात आली आहे. मुलांच्या लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सर्व संस्थाचालकांना बोलावून त्यांना संस्थेत काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वर्तन योग्य आहे की, नाही याबाबत तपासणी करण्यास सांगितले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

पुण्यातील विद्यार्थीनींवर झालेल्या अत्याचाराव बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,"पुण्यामध्ये स्कूल व्हॅन मध्ये एका चालकाने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले आहे. यासह त्याने आणखी एका मुलीलाही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरोधात आता पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कठोर कलमे लावण्यात आली आहे."

फडणवीस पुढे म्हणाले, "य़ा प्रकरणाशी संबंधित संस्थाचालकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांचा काही दोष आहे का हे तपासले जात आहे. इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितलं जात आहे की, विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन चालक म्हणून काम करणारे योग्य आहे की नाही, याची तपासणी केली पाहिजे."

Devendra Fadnavis
Pune Crime News: पुण्यातही बदलापूर! चालत्या स्कूलबसमध्ये सहा वर्ष चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

दरम्यान गेल्या काही काळात राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलांवरील अत्याचार वाढत आहेत. नुकतेच बदलापूरमधील शाळेतील शिपायाने विद्यार्थीनींवर अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर नुकतेच पोलीस चकमकीत आरोपीचा मृत्यू झाला होता.

Devendra Fadnavis
Sambhaji Bhide: "गणपती-नवरात्र उत्सवाचा चोथा झाला, हिंदू समाजाला XXX...";  संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.